‘सलमान भाईसाठी मी दोन्ही किडन्या विकल्या’,हे काय बरळली Rakhi Sawant
 
                          
         Bigg Boss 19 मध्ये ‘प्रणित-मालती’ची नवी लव्ह स्टोरी? सोशल मिडीयावर कमेंट्स चा पाऊस !
Bigg Boss 19 चं घर म्हणजे नात्यांचा खेळ, कुणाची दोस्ती, कुणाचं भांडण, तर कुणाचं प्रेम! या सिझनमध्ये सुरुवातीपासून अनेक जोड्या चर्चेत आल्या. अभिषेक बजाज (Abhishek Bajaj) आणि अशनूर कौर( Ashnoor Kaur), नेहल चुडासमा (Nehal Chudasama) आणि बसीर अली (Baseer Ali), तर तान्या मित्तल (Tanya Mittal) आणि अमाल मलिक (Amal Malik) या जोड्यांचे हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेन्ड झाले होते. पण आता एक नवीन जोडी सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे मराठमोळा कॉमेडियन प्रणित मोरे (Pranit More) आणि अभिनेत्री मालती चाहर (Malati Chahar)! (Bigg Boss 19)

वाइल्ड कार्ड एन्ट्रीने घरात आलेली मालती सुरुवातीला सगळ्यांशी भिडली होती. पण आता ती प्रणितसोबत एक वेगळं बॉन्डिंग तयार करताना दिसतेय. नुकत्याच शेअर झालेल्या प्रोमोमध्ये गौरव खन्ना (Gaurav Khanna) आणि प्रणितसोबत चालताना मालतीची गंमत होते, आणि तिच्या रागावर प्रणित आपल्या विनोदी स्टाईलमध्ये माफी मागतो. गंमत म्हणजे, तो आपलं हुडी तिला वापरण्यासाठी देतो कारण आतापर्यंत ती अमालचं हुडी वापरत होती! या सीननंतर घरात एकच हशा पिकला. यानंतर मालती प्रणितला गप्पा मारण्यासाठी बाहेर बोलावते, आणि तोही लगेच तयार होतो. हे पाहून फरहाना भट्ट (Fharhana Bhatt) आणि तान्या मित्तल त्यांना छेडतात आणि घरात एक नवीन हॅशटॅग जन्म घेतो #MaNit!. गौरव खन्ना मात्र थोडा क्रिएटिव्ह ठरतो आणि तो म्हणतो, “अरे, हे तर #MalNit असायला पाहिजे!”

इतकंच नाही, प्रणितने मालतीसाठी खास ब्रेकफास्ट ही बनवला अंड्यांची डिश! हे पाहून गौरव आणि मृदूल दोघेही त्याची मजा घेतात. प्रोमो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला. काहींना ही जोडी अप्रतिम वाटली, तर काहींनी लिहिलं, “मालती आता अमालचा ग्रुप सोडून प्रणितसोबत खूप पॉझिटिव्ह दिसतेय!” (Bigg Boss 19)
==============================
हे देखील वाचा: Dr. Nilesh Sable पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; ‘होम मिनिस्टर’ शी होतेय तुलना…
==============================
सध्या ‘बिग बॉस 19’चं घर प्रणित-मालतीच्या या नव्या केमिस्ट्रीमुळे रंगतदार झालं आहे. हसत-खेळत सुरु झालेली ही दोस्ती खरंच प्रेमात बदलेल का? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. पुढच्या एपिसोडमध्ये या नव्या “#MaNit लव्ह अँगल”चा शेवट काय होईल, हे पाहणं खरंच मनोरंजक ठरेल!
