‘सलमान भाईसाठी मी दोन्ही किडन्या विकल्या’,हे काय बरळली Rakhi Sawant
 
                          
         ‘ऊत’ चित्रपटात अभिनेत्री Suparna Shyam दिसणार कणखर भूमिकेत
मराठी मालिकांमध्ये खलनायिका साकारणार अभिनेत्री सुपर्णा श्याम आता लवकरच एका वेगळ्या भूमिकेत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.. छोट्या पडद्यावरील ‘दुहेरी’ या मालिकेतून अल्पावधीत घराघरांत सुपरिचित झालेली सुपर्णा ‘ऊत’ या आगामी मराठी चित्रपटातून नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे… सुपर्णा ‘ऊत’ या चित्रपटात ‘गुलाब’ या कणखर मध्यमवर्गीय गृहिणीच्या व्यतिरेखेत दिसणार असून स्वतंत्र विचारसरणीच्या गुलाबाचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन दाखवताना ‘प्रेम’ व ‘लग्न’ या दोन्ही गोष्टी ती कशारीतेने हाताळते हे पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, सुपर्णा हिने आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना म्हटलं की, ‘या भूमिकेने मला खूप चांगला अनुभव दिला. ही अशा प्रेमाची कथा आहे जी कदाचित आपल्या अवतीभवती देखील असू शकते. प्रेमाला जिंकत आपण ते कसं निभावतो? याची कथा दाखवताना प्रेमाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन ही ‘ऊत’ या चित्रपटात मांडण्यात आला आहे.
================================
हे देखील वाचा : दिग्दर्शक एस.एस.राजामौलींच्या Bahubali Franchiseच्या अद्भूत गोष्टी!
================================
ऊत या चित्रपटात सुपर्णा सोबत राज मिसाळ, आर्या सावे ही नवी जोडी या चित्रपटात दिसणार आहे. राजकुमार तांगडे, अनिकेत केळकर, प्राजक्ता केळकर, पुरषोत्तम वाघ, शैलेश कोरडे, अर्चना रावल, दीपक पाटील, वैदही ठाकूर, सिद्धेश्वर थोरात, अभय कुलकर्णी, श्रेया देशमुख, धनश्री साटम आदि कलाकारांच्या सुद्धा यात भूमिका आहेत. राम मलिक दिग्दर्शित हा चित्रपट २१ नोव्हेंबरला महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi
