‘सलमान भाईसाठी मी दोन्ही किडन्या विकल्या’,हे काय बरळली Rakhi Sawant
 
                          
         Gondhal Movie Trailer: श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम असलेल्या ‘गोंधळ’चा ट्रेलर लॉन्च !
मराठी संस्कृती आणि तिच्या श्रद्धांचा एक अविभाज्य भाग म्हणजे “गोंधळ“. त्याचे महत्त्व आपल्या परंपरेत कधीच कमी झालेले नाही. विशेषतः नवरा-नवरीच्या जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी साजरा होणारा गोंधळ, तो एक सण, एक विधी, एक सांस्कृतिक दृष्टीकोण असतो. आणि आता, हा गोंधळ रुपेरी पडद्यावर अवतरतोय तेही एक रोमांचक चित्रपट बनून! राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक संतोष डावखर यांच्या दिग्दर्शनात आणि डावखर फिल्म्सच्या प्रस्तुतिकरणात, ‘गोंधळ’ चित्रपट आपल्या प्रेक्षकांमध्ये धडक देणारा ठरतोय. पारंपरिक वाद्यांचे नाद, मंत्रोच्चार आणि नृत्य यांसारख्या विशिष्ट वातावरणाने सजलेला ट्रेलर लाँच सोहळा यावेळी संपूर्ण कर्जत स्थानिकांसमवेत थाटात पार पडला.(Gondhal Movie Trailer)

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एक रहस्यमय गूढता आहे. प्रत्येक व्यक्तिरेखा एक नवा खुलासा करत आहे आणि प्रेक्षकांच्या मनात अधिक उत्सुकता निर्माण करत आहे. पारंपरिक गोंधळाच्या पद्धतीचा आकर्षक आणि दृश्यात्मक अनुभव, त्यात आधुनिक सिनेमॅटिक तंत्रज्ञानाचा संगम हा एक विलक्षण अनुभव देत आहे. गोंधळ केवळ एक पारंपरिक विधीच नाही, तर एक सांस्कृतिक कादंबरी आहे, ज्यात असंख्य भावना आणि रहस्ये दडलेली आहेत. ‘गोंधळ’ चित्रपटाची कथा आपल्या परंपरेच्या मुळाशी असलेल्या श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा उत्तम संगम आहे. या चित्रपटात कथा आणि संवादांमध्ये खूप आर्तता आहे, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये एक भावनिक आणि सांस्कृतिक अनुभव निर्माण होईल.

चित्रपटाचे दिग्दर्शन आणि पटकथा संतोष डावखर यांनीच केली आहे, आणि त्याच्या शब्दात, “प्रत्येक दृश्य, प्रत्येक संवाद, आणि प्रत्येक सूर आपल्या संस्कृतीच्या गोड आवाजात प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल.”चित्रपटाच्या प्रमुख भूमिकांमध्ये किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे, कैलाश वाघमारे, आणि इतर नामवंत कलाकार असतील. या कलाकारांच्या शानदार अभिनयाने “गोंधळ” चित्रपट अधिक रंगतदार होईल, असे म्हणता येईल.(Gondhal Movie Trailer)
=============================
हे देखील वाचा: अखेर स्टार प्रवाहवरील प्रेक्षकांच्या आवडती मालिका ‘अबोली’ने घेतला प्रेक्षकांचा निरोप !
=============================
