‘सलमान भाईसाठी मी दोन्ही किडन्या विकल्या’,हे काय बरळली Rakhi Sawant
 
                          
         साईबाबा फेम अभिनेते सुधीर दळवींना मदत केली आणि Riddhima apoor ट्रोल झाली… काय आहे प्रकरण?
रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेतील गुरु वशिष्ठ आणि साई बाबा फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांच्या प्रकृतीबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे… ८ ऑक्टोबरपासून मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असून वयाच्या ८६व्या वर्षी ते सेप्सिस या आजाराने ग्रस्त आहेत… दरम्यान, त्यांच्या उपचारासाठी दळवींचं कुटुंब आर्थिक मदत मागत असून बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याची बहिण रिधिमा कपूर हिने त्यांना मदत केली आहे… मात्र, तिच्या या मदतीमुळे तिला लोकांचं कौतुक नाही तर ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे… नेमकं प्रकरण काय आहे? जाणून घेऊयात…

तर, सुधीर दळवी यांच्या उपचारासाठी बॉलिवूड कुटुंबातून रिधिमा कपूर साहनी हिने दळवी यांच्या कुटुंबाला उपचारासाठी आर्थिक मदत केली आहे. पण यामुळे ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली. दळवींच्या कुटुंबाने त्यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी लोकांना आर्थिक मदतीचे आवाहन केले होते. आणि आवाहनाला प्रतिसाद देत, रिद्धिमा कपूर साहनी हिने पुढाकार घेत त्यांना मदत केली.. यानंतर, सोशल मिडियावर कमेंट करत तिने त्यांना मदत केल्याची माहिती दिली… मात्र, याच कमेंटमुळे रिधिमा ट्रोल झाली आहे… (Entertainment News)
नेटकऱ्यांनी रिधिमाला टोमणे मारत आर्थिक मदत केल्यानंतर त्याबद्दल जगजाहिरपणे का सांगायचं असा प्रश्न विचारला आहे… यावर स्पष्ट शब्दांत रिधिमा कपूरने उत्तर देत म्हटलं हे की, “जीवनात प्रत्येक गोष्ट केवळ दिखाव्यासाठी नसते. एखाद्या गरजू व्यक्तीला, आपल्या क्षमतेनुसार मदत करणे, हा सर्वात मोठा आशीर्वाद आहे.”
================================
हे देखील वाचा : दिग्दर्शक एस.एस.राजामौलींच्या Bahubali Franchiseच्या अद्भूत गोष्टी!
================================
दरम्यान, सुधीर दळवी यांच्या कामांबदद्ल बोलायचं झालं तर साई बाबांच्या भूमिकेसाठी सुधीर दळवी हे पार लोकप्रिय आहेत… अलीकडे हिंदी मालिंकामध्ये त्यांनी जरी ही भूमिका साकारली असली तरी मनोज कुमार यांच्या ‘शिर्डी के साई बाबा’ या चित्रपटातही सुधीर दळवींनीच साई बाबा साकारले होते… इतकंच नाही तर ‘क्यु की सास भी कभी बहु थी’, ‘जुनून’ अशा काही हिंदी मालिकांमध्येही त्यांनी उल्लेखनीय भूमिका केल्या आहेत… याशिवाय, श्याम बेनेगल यांच्या ‘भारत एक खोज’ या अजरामर मालिकेत ‘औरंगजेब’ या भागात त्यांनी शाहजहानची भूमिका उत्कृष्टपणे सादर केली होती… दळवींनी मराठीपेक्षा हिंदी मनोरंजनसृष्टीत अधिक कामं केली… ‘अपनापन’, ‘कर्मयोगी’, ‘क्रांती’, ‘सत्यमेव जयते’, ‘अग्नि’, ‘कानून’ अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये ते झळकले…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi
