‘सलमान भाईसाठी मी दोन्ही किडन्या विकल्या’,हे काय बरळली Rakhi Sawant
 
                          
         Abhishek Bachcham याने फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतला?
बॉलिवूडमध्ये खऱ्या टॅलेंटपेक्षा तुमची वरपर्यंत किती पोहोच आहे किंवा तुम्ही इंडंस्ट्रीतल्या कोणत्या फॅमिलीतून येता यावर तुमचं करिअर अवलंबून असतं असं म्हटलं जातं… इतकंच नाही तर बॉलिवूडमध्ये पैसे देऊन पुरस्कार विकत घेतले जातात असं देखील म्हणतात… आता कदाचित यादी मोठी असेल पण काही कलाकारांनी उघडपणे, “हो मी पुरस्कार विकत घेतला आहे”, असं जाहिरपणे म्हटलं आहे… कोण आहेत ते कलाकार हे आपण जाणून घेऊयातच पण सध्या २५ वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये पहिल्यांदाच फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेल्या अभिषेक बच्चनवर (Abhishek Bachchan) त्याने हा पुरस्कार विकत घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे… यावर त्याने काय उत्तर दिलं आहे हे देखील जाणून घेऊयात…

तर, नुकत्याच संपन्न झालेल्या ७०व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात अभिषेक बच्चनला ‘I Want To Talk’ या चित्रपटासाठी ७०व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. पुरस्कार स्वीकारताना अभिषेक अत्यंत भावूक झाला होता. २५ वर्षांनी त्याला हा फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला. मात्र, या पुरस्काराबद्दल त्याच्यावर टीका होत आहे. एका नेटकऱ्याने सोशल मिडियावर अभिषेकने हा पुरस्कार पैसे देऊन घेतला असल्याची टीका करत लिहिलं आहे की, “तुम्ही तुमच्या करिअरमध्ये एकही ब्लॉकबस्टर किंवा हिट सिनेमा केला नसेल, तरी पुरस्कार खरेदी करून आणि PR करून तुम्ही प्रसिद्ध होऊ शकता, याचं उदाहरण म्हणजे अभिषेक बच्चन. सांगताना वाईट वाटतं की, अभिषेक हा एक आदर्श उदाहरण आहे की, तुम्ही पुरस्कार खरेदी करून आणि PR करून प्रसिद्ध होऊ शकता.” (Abhishek Bachchan News)

पुढे त्या युजरने असं देखील लिहिलं आहे की, त्याने यंदा I Want To Talk साठी फिल्मफेअर पुरस्कार जिंकला. पण, हा चित्रपट काही मोजक्या पैसे दिलेल्या समीक्षकांव्यतिरिक्त कोणीही पाहिला नाही आणि आता मी सर्व ट्विट्स पाहतोय, जिथे २०२५ त्याचं वर्ष आहे असं सांगितलं जात आहे, हे खूप मजेशीर आहे. त्याच्यापेक्षा खूप चांगले अभिनेते आहेत, ज्यांना अधिक ओळख, प्रशंसा आणि पुरस्कार मिळायला हवेत; पण दुर्दैवाने त्यांच्याकडे योग्य PR आणि पैसे नाहीत.”
यावर अभिषेकने उत्तर दिलं आहे की, “माझ्याकडून कधीही कोणताही पुरस्कार खरेदी केला गेला नाही किंवा मी काही PR केलेला नाही. हा पुरस्कार फक्त कठोर परिश्रम, कष्ट आणि घाम गाळून मिळालेला आहे.” यापुढे अभिषेक टीका करणाऱ्या ट्रोलर्सला उद्देशून म्हणतो, “माझं हे सांगण तुम्ही मान्य कराल की नाही अशी मला शंका आहे, त्यामुळे तुम्हाला योग्य ते उत्तर देण्याचा उत्तम मार्ग म्हणजे मी आणखी मेहनत करेन, जेणेकरून माझ्या भविष्यातील कोणत्याही यशावर तुम्हाला शंका येऊ नये; मी तुम्ही चुकीचे आहात हे सिद्ध करेन.”
दरम्यान, या आधी देखील बॉलिवूडचे बरेच नामवंत कलाकार पुरस्कार विकत घेतात असं म्हटलं गेलं होतं.. यात बॉलिवूडचा किंग खान शाहरुख (Shah Rukh Khan) देखील आहे.. बऱ्याच वर्षांपूर्वी एका पुरस्कार सोहळ्यातच शाहरुख खान याने जाहिरपणे, “हो मी माझे पुरस्कार विकत घेतो”, असं म्हटलं होतं… इतकंच नाही तर ऋषी कपूर यांनी देखील त्यांच्या पहिल्याच चित्रपटासाठीचा पुरस्कार विकत घेतला होता…(Bollywood Celebs Buy Awards)

ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांनी या पुरस्काराचा किस्सा त्यांच्या ऑटोबायोग्राफीत लिहिला आहे… १९७३ मध्ये ऋषी कपूर यांनी ‘बॉबी’ चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण केलं.. या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. ऋषी यांनी लिहिलं होतं की, ‘बॉबीसाठी मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल्याने अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) बहुतेक निराश झाले होते. हा अॅवॉर्ड आपल्याला ‘जंजीर’साठी मिळेल, असे त्यांना वाटले होते. दोन्ही चित्रपट एकाच वर्षी (१९७३) मध्ये प्रदर्शित झाले होते. मला हे सांगताना खरं तर लाज वाटतेय, की हा पुरस्कार मी लाच देऊन खरेदी केला होता. त्यावेळी मी खूपच साधाभोळा होतो. तारकनाथ गांधी नावाच्या एका पीआरओने मला म्हटले होते, सर ३० हजार द्या मी तुम्हाला पुरस्कार मिळवून देतो. मी काहीही विचार न करता पैसे दिले. माझा सेक्रेटरी घनश्यामनेही मला म्हटले होते, सर पैसे देऊयात आणि अवॉर्ड घेऊयात.’

================================
हे देखील वाचा : Isha Deol : अभिषेक बच्चन जावई व्हावा अशी होती हेमा मालिनींची इच्छा!
================================
आता एक मुद्दा असा देखील येतो की जर का अभिषेक बच्चन याने आता पुरस्कार विकत घेतला आहे तर त्याला ते फार वर्षांपूर्वीच करता आलं असतं.. कारण त्याचे वडिल महानायक अमिताभ बच्चन बॉलिवूडचे स्ट्रॉंग पिलर आहेत… पण तरीही ट्रोलर्सना ट्रोल करण्यासाठी मुद्दा हवाच असतो आणि तो कदाचित अभिषेक यावेळी निमित्त ठरला असेल… दुसरं म्हणजे, शाहरुख असो किंवा ऋषी कपूर या दोन्ही सुपरस्टार्सने मी पुरस्कार विकत घेतला होता हे सांगण्याचं धाडस केलं… कदाचित इंडस्ट्रीत असे बरेच कलाकार कदाचित असतील… परंतु, सध्या तरी टेलेंट आणि नेपोटिझम या दोन्ही गोष्टी Hand In Hand बॉलिवूडमध्ये सुरु आहेत असं म्हटलं तर ते नक्कीच चुकीचं ठरणार नाही…. (Bollywood News)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi
