Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Shah Rukh Khan : “सौ देशों में बदनाम, दुनिया ने दिया सिर्फ एकही नाम किंग’; पाहिली का पहिली झलक?
किंग खान (Shsh Rukh Khan)( कधीच आपल्या फॅन्सना नाराज करत नाही… प्रत्येकवेळी तो आपल्या चाहत्यांसाठी काहीतरी आनंदाची बातमी घेऊन येतोच… आता बऱ्याच महिन्यांपासून खरं तर ज्या चित्रपटाची चर्चा सुरु होती त्या ‘किंग’ (King Movie) चित्रपटाची पहिली झलक शाहरुख खानच्या ६०व्या वाढदिवशी रिलीज करण्यात आली आहे… या टायटल रिव्हील व्हिडिओत पुन्हा एकदा रोमॅंटिक बॉय शाहरुख ‘पठाण’ चित्रपटासारखाच Action Mode मध्ये दिसतोय… (Entertainment News)

सिद्धार्थ आनंद यांचं दिग्दर्शन असलेल्या ‘किंग’ चित्रपटातील शाहरुख खानची पहिली झलक अखेर समोर आली आहे… शाहरुखनेच सोशल मिडियावर व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “100 देशांमध्ये कुप्रसिद्ध, जगाने त्याला फक्त एकच नाव दिले आहे- किंग, आता शोची वेळ आली आहे. 2026 मध्ये थिएटरमध्ये.” (King movie news)

आता पुन्हा एकदा ‘पठाण’ (Pathan) चित्रपटानंतर शाहरुख खानचा किंग राडा घालणार याच शंका नाही… प्रेक्षकांनी जितकं शाहरुख खानच्या रोमॅंटिक पात्रांना आणि चित्रपटांना प्रेम दिलं तितकंच प्रेम त्याच्या Action Movies ना देखील देत आहेत… इतकंच नाही तर ३१ ऑक्टोबरपासून देशभराती चित्रपटगृहांमध्ये शाहरुख खान फिल्म फेस्टिवल साजरा केला जात असून यात त्याचे गाजलेले चित्रपट री-रिलीज करण्यात आले आहेत…
================================
हे देखील वाचा : Treesha Thosar ने वेधलं बॉलिवूडचं लक्ष; शाहरुख खानही झाला फॅन
================================
SRK Film Festival मध्ये ‘चेन्नई एक्सप्रेस’, ‘दिल से’, ‘देवदास’, ‘कभी हा कभी ना’, ‘ओम शांती ओम’, ‘जवान’ अशा बऱ्याच चित्रपटांचा समावेश आहे.. या फिल्म फेस्टिवलच्या निमित्ताने प्रेक्षकांना पुन्हा एकदा तरुणपणाच्या शाहरुख खानला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे…. तसेच, शाहरुख खान आणि सलमान खानचा रखडलेला ‘पठाण वर्सेस टायगर’ (Pathan vs Tiger) चित्रपट येणार का याकडेही लोकांचं लक्ष लागलं आहे… आणि पठाण चित्रपटानंतर पुन्हा एकदा सिद्धार्थ आनंद आणि शाहरुख खान ही जोडी काय धमाल उडवणार हे पाहण्यासाठी २०२६ची वाट पाहावी लागणार आहे… (Shah Rukh Khan and Salman Khan)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi