Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Asambhav Marathi Movie: मुक्ता बर्वे आणि प्रिया बापटची जोडी ‘असंभव’मधून थरारक अनुभव देणार!
मराठी चित्रपटसृष्टीतील दोन बहुप्रतिभावान अभिनेत्री, मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट, पुन्हा एकत्र येत आहेत आणि यावेळी त्यांची जोडी प्रेक्षकांना एका सस्पेन्स-थ्रिलर कथेत पाहायला मिळणार आहे. त्यांचा आगामी चित्रपट ‘असंभव‘, २१ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे, आणि त्याचा टीझर व पोस्टर प्रदर्शित होण्यापासूनच चित्रपटाच्या चर्चेला उधाण आलं आहे. या चित्रपटाची कथा गूढता, रहस्य आणि थराराने भरलेली आहे. ‘आम्ही दोघी’ नंतर पुन्हा एकत्र आलेल्या मुक्ता आणि प्रिया यांचा अभिनयाचा नवा रंग दर्शकांना मोठा आनंद देईल. दोघींनी साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या मनात एक ठराविक विचार, प्रश्न आणि गोंधळ निर्माण करणार आहे. ‘असंभव’ हा चित्रपट या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेला सिनेमा ठरण्याची शक्यता आहे. (Asambhav Marathi Movie)

चित्रपटावर बोलताना प्रिया बापट म्हणाली की, “आम्ही दोघी चित्रपट करताना आम्ही ज्या भावनिक प्रवासातून गेलो, तो अनुभव आमच्यासाठी अत्यंत खास होता. ‘असंभव’मध्ये आम्ही पुन्हा एकत्र आले आहोत, मात्र यावेळी तेच नातं एक नवा आयाम घेऊन प्रेक्षकांसमोर येईल. मुक्ता सोबत काम करताना एक वेगळाच उत्साह असतो, ती भूमिकेत पूर्णपणे स्वतःला झोकून देते, आणि त्यामुळे मीही तिच्यासोबत काम करण्यासाठी उत्साही असतो. यावेळी आमच्या नात्यात नवा थरार, आश्चर्य आणि गूढता दिसेल.”

मुक्ता बर्वे हीने यावर प्रतिक्रिया दिली आहे ती म्हणाली की, “प्रिया सोबत काम करणं नेहमीच आनंददायक असतं. ‘आम्ही दोघी’मध्ये आम्ही एकमेकांच्या नात्याची ऊब अनुभवली होती, तर ‘असंभव’मध्ये त्या नात्याभोवती एक रहस्य, थरार आणि भीतीचं वलय आहे. त्यामुळे काम करणे अधिक रोचक झालं आहे आणि प्रेक्षकांसाठी तो एक अविस्मरणीय अनुभव ठरेल.”(Asambhav Marathi Movie)
=================================
=================================
चित्रपटाचं दिग्दर्शन सचित पाटील यांनी केलं असून, सह-निर्देशन पुष्कर सुधाकर श्रोत्री यांनी केले आहे. मुंबई पुणे फिल्म्स एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली सचित पाटील आणि नितीन प्रकाश वैद्य यांनी निर्मिती केली आहे, आणि हे त्यांचं पहिलं सहकार्य आहे. सह-निर्माते म्हणून शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई, मंगेश परुळेकर आणि संजय पोतदार यांचा समावेश आहे. चित्रपटाच्या टीझर आणि पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. गूढतेने भरलेली कथा आणि दोघी प्रमुख अभिनेत्रींची जोडी प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न उभे करेल. थरारक आणि सस्पेन्सने भरलेली ही कथा एका नवीन आणि अनोख्या अनुभवाची वचन देत आहे. ‘असंभव’ हा चित्रपट नक्कीच चित्रपट रसिकांसाठी एक आकर्षक व थरारक अनुभव ठरणार आहे. याचे उत्तर लवकरच २१ नोव्हेंबरला मिळेल!