Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

हातात बंदूक अन् चेहऱ्यावर अंगार! Border 2 मधला वरुण धवनचा लूक समोर
१९९७ मध्ये आलेल्या ‘बॉर्डर’ चित्रपटाची क्रेझ आजही प्रेक्षकांमध्ये तितकीच आहे… प्रत्येक भारतीय नागरिकासाठी हा चित्रपट एक प्रेरणा आहे… आता लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग अर्थात ‘बॉर्डर २’ तब्बल २८ वर्षांनी आपल्या भेटीला येणार आहे… प्रेक्षकांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करणाऱ्या या चित्रपटात नवे चेहरे दिसणार आहेत… विशेष म्हणजे यात वरुण धवन याचीही एन्ट्री झाली असून त्याचा ‘बॉर्डर २’ मधला पहिला लूक समोर आला आहे…

बहुप्रतिक्षित बॉर्डर २ चित्रपटातील आपला लूक वरुण धवननेच त्याच्या इन्स्टाग्रामवरुन पोस्टर शेअर केला आहे… यात वरुण धवन सैनिकाच्या लूकमध्ये दिसत असून त्याच्या हातात बंदूक दिसतेय… शिवाय, या पोस्टरवर आजूबाजूला युद्धजन्य परिस्थिती असल्याचं पोस्टरवर दिसत असून यात वरुण सैनिक होशियार सिंग दहिया ही भूमिका साकारताना दिसणार आहे. वरुणने पोस्टर शेअर करत कॅप्शन लिहिलं आहे की, “देश का फौजी होशियार सिंग दहिया”…
================================
हे देखील वाचा : Daya Dongare : ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
================================
दरम्यान, १९९७च्या ‘बॉर्डर’ चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर, या चित्रपटात सनी देओल, सुनील शेट्टी, अक्षय खन्ना, जॅकी श्रॉफ यांच्या प्रमुख भूमिका होत्या…. जे.पी.दत्ता यांचं दिग्दर्शन असणाऱ्या या चित्रपटाने तेव्हा ३९ कोटींची कमाई केली होती आणि जगभरात ६६ कोटींचा पल्ला पार केला होता… तर,अनुराग सिंग दिग्दर्शित ‘बॉर्डर २’ चित्रपटात वरुण धवनसोबत सनी देओल, दिलजीत दोसांझ, अहान शेट्टी, सोनम बाजवा, मोना सिंग, मेधा राना यांच्या मुख्य भूमिका दिसणार असून २३ जानेवारी २०२६ रोजी ‘बॉर्डर २’ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi