Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Rishabh Shetty च्या ‘द प्राईड ऑफ भारत: छत्रपती शिवाजी महाराज’ चित्रपटात ‘हा’ अभिनेता साकारणार औरंगजेब!
‘कांतारा’ फेम ऋषभ शेट्टी सध्या चांगलाच चर्चेत आहे… ‘कांतारा – चॅप्टर १’ चित्रपटाने देशातच नाही तर जगभरात डंका वाजवला आहे… राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक-लेखक आणि अभिनेता ऋषभ शेट्टी आता लवकरच ऐतिहासिक चित्रपटात दिसणार असून यात तो छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे… ‘द प्राईड ऑफ भारत: छत्रपती शिवाजी महाराज’ असं या चित्रपटाचं नाव असून यात औरंगजेबाच्या भूमिकेत बॉलिवूडचा कलाकार झळकणार आहे…

मिळालेल्या माहितीनुसार, मुघल शासक औरंगजेबाच्या भूमिकेत अभिनेता विवेक ऑबरॉय दिसणार असं सांगितलं जात आहे… तर, अभिनेत्री शेफाली शाह राजमाता जिजाऊ यांची भूमिका साकारणार असल्याची माहिती समोर आली आहे… खरं तर पहिल्यांदाच विवेक ऑबरॉय ऐतिहासिक चित्रपट दिसणार असून ही भूमिका त्याच्यासाठी एक टर्निंग पॉईंट असणार हे नक्की…
================================
हे देखील वाचा : Kantara : The Legend-Chapter 1 मधील ‘तो’ म्हातारा कोण होता?
================================
‘द प्राईड ऑफ भारत: छत्रपती शिवाजी महाराज’ या चित्रपटाचं दिग्दर्शन संदीप सिंग करणार आहेत… विशेष म्हणजे हा त्यांचा दिग्दर्शकीय पदार्पणाचा पहिलाच चित्रपट असून त्यांच्या करिअरमधील हा एक महत्त्वाकांक्षी ऐतिहासिक चित्रपट मानला जात आहे… याव्यतिरिक्त या चित्रपटामध्ये राष्ट्रीय आणि ऑस्कर पुरस्कार विजेत्या अनेक तंत्रज्ञानांचा सहभाग असून चित्रपटाचं चित्रिकरण सध्या सुरु आहे.. २०२७ मध्ये हा चित्रपट जगभरातील ४० हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हिंदी, मराठी, कन्नड, तेलुगू, तमिळ, मल्याळम, बंगाली आणि इंग्रजी अशा अनेक भाषांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi