Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Gondhal Movie : इलैयाराजा यांच्या सुरेल संगीतानं सजलं ‘चांदण’!
पद्मभूषण इलैय्याराजा यांनी पहिल्यांदाच मराठी चित्रपटसृष्टीतील रांगड्या मातीतील चित्रपटाला संगीत दिलं असून नुकतंच हे भावनिक गाणं रिलीज झालं आहे… संतोष डावखर दिग्दर्शित ‘गोंधळ’ या चित्रपटातील हे पहिलं गाणं ‘चांदण’ प्रेम आणि नात्यांच्या कोमल भावनांना स्पर्श करणारं आहे… हे गाणं मराठीतील दिग्गज गायक-संगीतकार अजय गोगावले यांच्या आवाजात असल्यामुळे अधिकच रंगत वाढली आहे…
दरम्यान, पारंपरिकतेचा साज आणि आधुनिकतेचा सूर यांचा सुंदर मेळ साधणाऱ्या ‘चांदण’ मध्ये अजय गोगावले, आर्या आंबेकर आणि अभिजीत कोसंबी या तीन गायकांच्या आवाजाचा अप्रतिम संगम पाहायला मिळतो. योगेश सोहोनी आणि इशिता देशमुख यांच्या जोडीवर चित्रित झालेल्या या गाण्याचे सादरीकरणही मंत्रमुग्ध करणारं आहे.

या गाण्याबद्दल दिग्दर्शक संतोष डावखर म्हणतात, ‘’या गाण्याला संगीतकार इलैयाराजा यांच्यासारख्या दिग्गजांनी संगीतबद्ध करणं, हे आमच्यासाठी स्वप्न साकार झाल्यासारखं आहे. ‘चांदण’ हे गाणं म्हणजे भावनांचा एक सुंदर प्रवास आहे. या गाण्याद्वारे आम्ही प्रेमाच्या गाभ्याला एक वेगळी ओळख देण्याचा प्रयत्न केला आहे. अजय, आर्या आणि अभिजीत यांनी त्यांच्या आवाजाने या गाण्याला आत्मा दिला आहे.”
================================
हे देखील वाचा : ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाला संगीत देणाऱ्या पद्मभूषण Ilaiyaraaja यांचा सुरेल प्रवास….
================================
दरम्यान, डावखर फिल्म्स प्रस्तुत ‘गोंधळ’ या चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे, सुरेश विश्वकर्मा, कैलाश वाघमारे आदी कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. १४ नोव्हेंबरपासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा ‘गोंधळ’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक एक भावनिक संगीतयात्रा देखील ठरणार आहे
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi