Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Last Stop Khanda Movie Trailer: प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट सांगणारा हलकाफुलका, भावनिक आणि मनोरंजक प्रवास!
प्रेम… ही एक भावना आहे जी प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या रूपात उमटते. कधी ती हास्य आणते, कधी डोळ्यांत पाणी आणते, तर कधी जीवनाचा अर्थ शिकवते. अशाच प्रेमाच्या भावविश्वातून साकारलेला ‘लास्ट स्टॉप खांदा…’ हा मराठी चित्रपट सध्या जोरदार चर्चेत आहे. हा चित्रपट प्रेम, इमोशन आणि कॉमेडीचा उत्तम संगम सादर करणार असून, त्याचा ट्रेलर प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा कळस गाठला आहे. हा चित्रपट २१ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.(Last Stop Khanda Movie Trailer)

शिवम फिल्म क्रिएशन सिग्नेचर ट्यून्स आणि स्नेहा प्रॉडक्शन्स यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मित झालेल्या या चित्रपटाची टॅगलाईन आहे. “प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट”. या एका वाक्यातच चित्रपटाचा आत्मा दडलेला आहे. निर्माते प्रदीप मनोहर जाधव, सहनिर्माते सचिन कदम आणि अमृता सचिन जाधव यांनी एक प्रेक्षकांना भिडणारी कथा मोठ्या संवेदनशीलतेने सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी विनित परुळेकर यांनी निभावली असून, कथालेखक श्रमेश बेटकर हे स्वतः या चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत.

चित्रपटात जुईली टेमकर, निखिल बने, मंदार मांडवकर, शशिकांत केरकर, सुदेश जाधव, महेश कापरेकर, प्रियांका हांडे, डॉ. सचिन वामनराव, गणेश गुरव, निशांत जाधव, गिरीश तेंडुलकर आणि जयश्री गोविंद अशा तगड्या कलाकारांचा समावेश आहे. तसेच पाहुणे कलाकार म्हणून धनश्री काडगावकर, प्रभाकर मोरे, आणि अशोक ढगे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. छायांकन हरेश सावंत यांचं असून, कलादिग्दर्शन केशव ठाकुर यांनी केलं आहे. संगीतकार श्रेयस राज आंगणे यांनी दिलेलं संगीत चित्रपटाला विशेष रंगत आणतं, तर नृत्यदिग्दर्शन राहुल बनसोडे आणि रवी आखाडे यांनी केलं आहे. विशेष म्हणजे चित्रपटातील ‘शालू झोका दे गो मैना’ हे गाणं आणि टायटल ट्रॅक सोशल मीडियावर आधीच लोकप्रिय ठरले आहेत.(Last Stop Khanda Movie Trailer)
=================================
=================================
कथानकात एका तरुणाचं लहानपणापासून एका मुलीवर असलेलं एकतर्फी प्रेम दाखवण्यात आलं आहे. ती मुलगी आयुष्यात पुढे गेल्यानंतर, तिचं नातं तुटल्यावर पुन्हा तिच्या जीवनात त्या तरुणाचं आगमन होतं. पण या वेळी तो प्रेम जिंकतो का, की पुन्हा हरतो ? याचं उत्तर मिळणार आहे ‘लास्ट स्टॉप खांदा’ या चित्रपटातून. हा चित्रपट केवळ प्रेमकथा नसून, ती प्रत्येकाच्या मनात कुठेतरी लपलेल्या आठवणींना स्पर्श करणारी भावनिक सफर आहे. संवादांमधील विनोद आणि वास्तवतेचा संगम प्रेक्षकांना हसवत-रडवत ठेवेल. ट्रेलरमध्येच हलकाफुलकी कथा, खुसखुशीत संवाद आणि सुंदर छायांकनाची झलक दिसत असल्याने, प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबद्दलची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. २१ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा ‘लास्ट स्टॉप खांदा…’ हा प्रेमाचा, जीवनाचा आणि भावनांचा प्रवास प्रत्येकाने अनुभवायलाच हवा कारण शेवटी प्रत्येकाचं प्रेम कुठेतरी एका “लास्ट स्टॉप”वर येऊन थांबतं…