Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Suraj Chavan चं केळवण! बायकोेसाठी घेतला भारी उखाणा एकदा ऐकाचं…
‘बिग बॉस मराठी सीझन 5’चा विजेता म्हणून घराघरात ओळख निर्माण करणारा सुरज चव्हाण (Suraj Chavan) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, आणि यावेळी कारण आहे त्याचं लग्न! काही महिन्यांपासून चाहत्यांमध्ये त्याच्या लग्नाच्या चर्चेला चांगलीच उधाण आलेली होती. “सुरजची होणारी पत्नी कोण?”, “तिचं नाव काय?”, “ती काय करते?” अशा प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक होते. अखेर ही प्रतीक्षा संपली असून, सुरज आणि त्याची होणारी पत्नी संजना यांच्या केळवण सोहळ्याचा सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा खास सोहळा ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अंकिता प्रभू-वालावलकर (Ankita Prabhu Walavalkar) हिच्या घरी पार पडला. अंकिताने स्वतः या सोहळ्याचं आयोजन केलं होतं आणि आपल्या सोशल मीडियावरून त्याचे काही खास क्षण चाहत्यांसाठी शेअरही केले. यावेळी सुरज आणि संजना यांनी एकमेकांसाठी घेतलेले उखाणे खूपच चर्चेत आले आहेत.( Suraj Chavan Kelvan)

सुरजने आपल्या भावनांना व्यक्त करत म्हटलं, “बिग बॉस जिंकून झालं माझं स्वप्न पूर्ण, सजनाचं नाव घेतो बोललो होतो ना आधी करिअर मग लग्न!”तर संजनाने त्याला दिलेलं गोड उत्तरही तितकंच भन्नाट होतं ती म्हणाली, “बिग बॉसचा व्हिनर झाला माझ्या प्रेमात सायको, सुरजरावांचं नाव घेते मीच त्यांची होणारी बायको!” दोघांच्या या संवादाने वातावरणात प्रेम आणि हास्याची गोड लहर पसरली. उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत या जोडीवर प्रेमाचा वर्षाव केला.
==================================
===================================
काही दिवसांपूर्वी अंकिता प्रभू-वालावलकरनेच सुरज आणि त्याच्या होणाऱ्या पत्नीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. मात्र त्यावेळी तिने संजनाचा चेहरा उघड केला नव्हता. फोटोसोबत तिने लिहिलं होतं, “सुरजला खूप खूप शुभेच्छा! लग्नाला येणं शक्य होईल असं वाटत नाही, त्यामुळे ही छोटीशी भेट!” या पोस्टनंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता अधिकच वाढली होती. आता मात्र संजनाचा चेहरा समोर आल्यानंतर चाहत्यांनी या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला आहे. व्हिडिओमध्ये संजनाचं साधं, सुंदर रूप आणि सुरजच्या चेहऱ्यावरचं समाधान स्पष्ट दिसतंय.

सुरजनं अलीकडेच माध्यमांशी बोलताना सांगितलं की, “साखरपुडा, हळदी आणि लग्न हे सर्व सोहळे एकाच दिवशी होणार आहेत.” मात्र नेमकी लग्नाची तारीख त्याने अद्याप जाहीर केलेली नाही. तरीही चाहत्यांमध्ये आता लग्नसोहळ्याची उत्कंठा वाढली असून, सोशल मीडियावर “#SurajWedsSanjana” हा हॅशटॅग ट्रेंड होतोय.( Suraj Chavan Kelvan)
======================================
======================================
‘बिग बॉस मराठी’मधील आपल्या प्रामाणिक आणि जमिनीवरच्या व्यक्तिमत्त्वामुळे सुरजने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आता त्याच्या आयुष्यातील या नव्या पर्वाची सुरुवातही तितकीच खास ठरत आहे. केळवण सोहळ्यातील हशा, प्रेम आणि उखाण्यांची रंगत पाहून एक गोष्ट नक्की या वर्षातील सर्वात चर्चेत असलेलं लग्न म्हणजे ‘सुरज चव्हाण आणि संजना’चं लग्न!