Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

‘देवमाणूस’ फेम Kiran Gaikwad ने घेतला मोठा निर्णय; म्हणाला, ‘ सोशल मीडिया चांगल आहे पण…’
मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेता आणि ‘देवमाणूस‘ फेम किरण गायकवाड(Kiran Gaikwad) याने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे चाहत्यांना धक्का दिला आहे. “देवमाणूस” या मालिकेच्या दोन्ही यशस्वी पर्वानंतर आणि “देवमाणूस: मधला अध्याय” या सीझनमध्ये पुन्हा झळकलेल्या किरणने एक नवा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे चाहत्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. किरण गायकवाडने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला, त्यासोबतच एक कॅप्शनही लिहिले. या पोस्टमध्ये त्याने सोशल मीडियापासून काही काळासाठी ब्रेक घेण्याची घोषणा केली आहे. पोस्टमध्ये त्याने स्पष्टपणे सांगितले की, “सोशल मीडिया चांगली आहे, पण योग्य वेळ वापरता आली तर. माझा खूप वेळ सोशल मीडियावर जातोय, असं लक्षात आलं. म्हणून काही काळासाठी (कायमचा नाही) माझ्या ऑफिशियल हँडल्सवरून रजा घेतोय… भेटूया लवकरच. खूप खूप प्रेम.” याच कॅप्शनमध्ये त्याने #socialmediadetox हॅशटॅग वापरला आहे, ज्याचा अर्थ सोशल मीडियाच्या व्यसनापासून ब्रेक घेत आहे, असा दिसून येतो.(Actor Kiran Gaikwad)

किरण गायकवाडने सोशल मीडियापासून ब्रेक घेतल्याचे सांगितले असले तरी, त्याच्या चाहते यावर अनेक शक्यता व्यक्त करत आहेत. काही चाहत्यांचा अंदाज आहे की, त्याने हा ब्रेक त्याच्या आगामी सिनेमाच्या कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी घेतला आहे. काही दिवसांपूर्वी, त्याने एका मुलाखतीत आपल्या दिग्दर्शन आणि लेखनाच्या पदार्पणाबद्दल खुलासा केला होता. “आता निगेटिव्ह खूप झालं आहे, त्यामुळे म्हटलं आता थांबूयात आपण. मी स्वतःचा सिनेमासुद्धा लिहिला आणि त्याचं दिग्दर्शन सुद्धा झालंय. ‘FIR No 469’ नावाचा सिनेमा मी दिग्दर्शित केला आहे,” अशी माहिती त्याने दिली होती.
=================================
हे देखील वाचा: Suraj Chavan चं केळवण! बायकोेसाठी घेतला भारी उखाणा एकदा ऐकाचं…
=================================
किरणने यापूर्वी सांगितले होते की, त्याची काही तळमळ आणि खदखद आहे, जी त्याने लेखणीतून कागदावर उतरवली आहे. पुढील वर्षी या सिनेमाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे, सोशल मीडियापासून ब्रेक घेण्यामागे त्याच्या आगामी सिनेमाच्या पोस्ट-प्रोडक्शन आणि प्रमोशनवर लक्ष केंद्रित करण्याचा उद्देश असावा, असं म्हणता येईल.

तसेच, ‘देवमाणूस‘ या लोकप्रिय मालिकेने चांगला धुमाकूळ घातला आहे, आणि त्याच्या अभिनयाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना त्याच्या सोशल मीडियावर परत येण्याची आणि नवीन प्रोजेक्ट्सची माहिती मिळवण्याची इच्छा आहे. अनेक चाहत्यांनी पोस्टच्या कंमेंट्समध्ये किरणला लवकर परत येण्याची विनंती केली आहे, तर काहींना या ब्रेकला फक्त एक प्रकारचा “गंमत” समजले आहे. (Actor Kiran Gaikwad)
=============================
=============================
सामान्यत: कलाकार त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे सोशल मीडियावरून ब्रेक घेत असतात, परंतु किरण गायकवाडच्या बाबतीत याचा प्रभाव त्याच्या आगामी सिनेमा आणि त्याच्या अभिनयासंबंधी असलेल्या योजनेवर होईल, असा अंदाज आहे. किरण गायकवाडच्या या ब्रेक घेतल्याने चाहत्यांच्या मनात शंका निर्माण केली असली तरी, त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल असलेल्या अपेक्षेने यावर अधिक प्रकाश पडला आहे. तो लवकरच परत येणार, अशी आशा सर्वांनी व्यक्त केली आहे.