DDLJ : ‘या’ लोकप्रिय गाण्याच्या आधी पंजाबी ओळी टाकण्याची आयडीया

न्यू नॅशनल क्रश अलर्ट! निळ्या साडीतल्या मराठमोळ्या Girija Oak ला पाहून लोकं झाली सैराट!
सध्या सोशल मिडियाच्या काळात कधी कोणती अभिनेत्री रातोरात स्टार होईल याचा काही नेम नाही… शिवाय, नवे काहीतरी ट्रेण्ड सुरुच असतात… आता नॅशनल क्रशचा (National Crush Trend) ट्रेण्ड पुन्हा चर्चेत आला असून या आधी रश्मिका मंदाना, तृप्ती डिमरी यांना नॅशनल क्रशचा टॅग मिळाला होता… आणि आता निळ्या साडीतली गोड आणि सुंदर दिसणार मराठमोळी अभिनेत्री सगळ्याचं लक्ष वेधून घेत आहे… ती अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी असून गिरीजा ओक आहे… मराठी मनोरंजनसृष्टीत मालिका, नाटक आणि चित्रपटविश्वात तर तिने आपलं स्थान निर्माण केलं आहेच… पण आता अभिनय आणि सौंदर्यामुळे तिने ओटीटी आणि बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीही काबिज करत नॅशन क्रश बनली आहे…(Girija Oak)

तर, झालं असं की, सोशल मिडियावर निळ्या साडीतल्या अभिनेत्रीचा फोटो व्हायरल झाला… आणि ही कोण आहे हे जाणून घेण्याची लोकांनी उत्सुकता वाढली… आणि ही तर मराठी अभिनेत्री गिरीजा ओक असून तिला लोकांनीच नॅशनल क्रश जाहिर करुन टाकलं.. गिरिजाने आजवर मराठी, हिंदी आणि कन्नड चित्रपटांमध्ये कामं केली आहेत… आणि बॉलिवूडच्या भाषेत सांगायचं झालं तर ती नेपोकिड अर्थात ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक यांची लेक आहे….(Marathi actress as national Crush)

गिरीजा ओक हिने द लल्लन टॉपला दिलेल्या मुलाखतीमुळे खरं तर ती व्हायरल झाली… या मुलाखतीत तिने बॉलिवूडमध्ये काम करण्याचा अनुभव देखील शेअर केला होता… शाहरुख खान, आमिर खान यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणाऱ्या गिरीजाच्या निळ्या साडीतील लूक आणि सौंदर्याने लोकांना वेड लागलं आहे… सोशल मीडियावर ‘नॅशनल क्रश’ ही पदवी मिळवणारी गिरीजा तरुणाईला भुरळ घालत आहे…. लवकरच ती काहीतरी तिचा खास प्रोजेक्ट चाहत्यांसाठी घेऊन येईल यात शंकाच नाही…
================================
हे देखील वाचा : एकाच वर्षात ७ सुपरहिट चित्रपट देणारे एकमेव अभिनेते म्हणजे He-Man Dharmendra
================================
दरम्यान, गिरीजाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर जवान चित्रपटात शाहरुख खान सोबत नुकतीच ती जळकली होती… याशिवाय, ‘तारे जमीन पर’, ‘द वॅक्सिन वॉर’, ‘शोर इन द सिटी’, ‘क्वाला’ अशा अनेक हिंदी चित्रपटांतही तिने कामं केली आहेत… गिरीजाने वयाच्या १५ व्या वर्षी चित्रपटात काम केलं होतं… ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’, ‘गुलमोहर’, ‘अडगुळं मडगुळं’, ‘मानिनी’ अशा अनेक मराठी चित्रपट आणि ‘लज्जा’ या मराठी मालिकेतही तिने काम केलं आहे…(Entertainment News)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi