DDLJ : ‘या’ लोकप्रिय गाण्याच्या आधी पंजाबी ओळी टाकण्याची आयडीया

‘तुंबाड’ फेम दिग्दर्शक राही अनिल बर्वे घेऊन येणार Mayasabha; ‘हा’ कलाकार साकारणार प्रमुख भूमिका
‘तुंबाड’ (Tumbbad) सारखा कल्ट क्लासिक चित्रपट देणारे दिग्दर्शक राही अनिल बर्वे (Rahi Anil barve) पुन्हा एकदा नवा चित्रपट घेऊन आपल्या भेटीला येणार आहेत… खरं तर बऱ्याच वर्षांपासून रखडलेला त्यांचा मायासभा (Mayasabha) हा चित्रपट आता रिलीज ोहणार असून २०१८ पासून हा चित्रपट मेकिंग प्रोसेसमध्ये होता… विशेष म्हणजे आजवर कॉमेडी भूमिका साकारणारे आणि उत्कृष्ट डान्सर असणारे अभिनेते जावेद जाफ्री एका वेगळ्याच अवतारात प्रेक्षकांसमोर येणार आहेत… नुकताच या Mayasabha चित्रपटातील जावेद जाफ्रींचा पहिला लूक समोर आला असून प्रेक्षक हा लूक पाहून गार झाले आहेत… (Entertainment News)

‘मायासभा’ या चित्रपटातील पहिल्या पोस्टरवर जावेद जाफ्री (Jaaved Jaaferi) यांना मुखवटा असलेला लूक समोर आला आहे… यात त्यांचे सील्वक केस आणि गोल्डन मास्क घातलेला चेहरा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा आहे… मायासभाचं हे पोस्टर रिलीज करत त्याच्याखाली कॅप्श लिहिलं आहे की, “काही वर्षांपूर्वी आम्ही हा नवा प्रयोग करण्याचं ठरवलं होतं… या चित्रपटातून परमेश्वर खन्ना (Javaved Jaaferi) यांचं एक वेगळं जग भेटीला येणार आहे… Enjoy your golden hunt”… (Bollywood)
================================
हे देखील वाचा : Tumbbad राही बर्वेने बनवला नाही तर….
================================
दरम्यान, जावेद जाफ्री म्हटलं की डोळ्यांसमोर ९०च्या जनरेशनसमोर ‘बुगी वुगी’ हा डान्स रिएलिटी शो आधी येतो… याशिवाय धमाल सारख्या अनेक चित्रपटांती त्यांनी विनोदी भूमिका विशेष लक्षात राहते… गेले अनेक वर्ष इंडस्ट्रीत डान्सर आणि अभिनेते म्हणून कार्यरत असणाऱ्या जावेद यांचा ‘दे दे प्यार दे २’ (De De Pyaar De 2) चित्रपट १४ नोव्हेंबर २०२५ रोजी रिलीज होणार आहे… दरम्यान, काही महिन्यांपूर्वी एका मुलाखतीत जावेद यांनी मायासभा या चित्रपटाबद्दल भाष्य केलं होतं… ते म्हणाले होते की, “या चित्रपटाची कथा एका निर्मात्याची असून त्याच्या काळातील तो करण जोहर आहे.. त्याने त्याच्या काळात अनेकांना चित्रपटातून ब्रेक दिला… त्यापैकीच एका मुलीशी त्याचं प्रेम जुळलं आणि तिच्याशी त्याने लग्न केलं… थोडक्यात सांगायचं झालं तर, ही एक वेगळी प्रेमकथा आहे”…

तर, दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर जवळपास ८ वर्ष त्यांनी ‘तुंबाड’ या चित्रपटाचं शुटींग केलं होतं… हस्तरच्या जगात घेऊन जाणाऱ्या या चित्रपटाने फारसे पुरस्कार मिळवले नसले तरी जागतिक पातळीवर कौतुकाची थाप मिळवली… सोहम शाह (Sohum Shah) यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या तुंबाड चित्रपटाचा सीक्वेल ‘तुंबाड २’ मेकिंगच्या प्रोसेसमध्ये आहे… या व्यतिरिक्त राही अनिल यांचे ‘पहाडपांगिरा’, ‘पक्षीतिर्थ’, ‘गुलकंद टेल्स’ आणि ‘रक्त ब्रम्हांड : द ब्लडी किंगडम’ हे आगामी चित्रपट लवकरच रिलीज होणार आहेत…. (Rahi Anil Barve Upcoming Movies)