यांचं ठरलंय! भर कार्यक्रमात Vijay Devarkonda नं दिली Rashmika Mandanna

Aadinath Kothare दिसणार डिटेक्टिव्हच्या भूमिकेत!
‘पाणी’ (Paani Movie) चित्रपटाच्या यशानंतर आता अभिनेता आदिनाथ महेश कोठारे (Aadinath Kothare)नव्या प्रोजक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे… १०० डेज या मालिकेत तो पोलिसाच्या भूमिकेत दिसला होता आणि आता तो डिटेक्टिव्हच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे… आदिनाथ सध्या त्याच्याचनिर्मिती संस्थेच्या ‘नशीबवान’ मालिकेत तो काम करताना दिसत आहे. आता आगामी ‘डिटेक्टिव धनंजय’ वेबसीरिज मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून वेबसीरिजचा मुहूर्त नुकताच संपन्न झाला…(Marathi News)

आदिनाथ कोठारे ‘डिटेक्टिव धनंजय’ वेबसीरिजमध्ये डिटेक्टिव्हची भूमिका साकारणार असून या सीरीजची निर्मिती देखील तोच करणार आहे… मुंबईत या सीरीजच्या शुटींगला सुरुवात झाली असून झी ५ वर ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आसं सांगितलं जात आहे… श्रीरंग गोडबोले यांची इंडियन मॅजिक आय आणि आदिनाथ कोठारेची स्टोरीटेलर्स नुक प्रायव्हेट लिमिटेड या दोन बड्या निर्मिती संस्थांच्या माध्यमातून सीरीजची निर्मिती होणार आहे. गिरीश जोशी यांनी या सीरिजसाठी स्क्रीनप्ले लिहिला असून श्रीरंग गोडबोले निर्मितीसोबतच दिग्दर्शन देखील करणार आहेत. (Entertainment News)
================================
हे देखील वाचा: Ramayana Movie : बॉलिवूडचा ८३५ कोटींचा पहिला बिग बजेट Mythological चित्रपट!
=================================
आदिनाथ कोठारे याच्या आगामी चित्रपटांबदद्ल बोलायचं झालं तर ‘रामायण’ (Ramayan Movie) सह बॉलिवूडच्या बड्या प्रोजेक्ट्सचा तो भाग होणार आहे… नितेश तिवारी दिग्दर्शित रामायण या चित्रपटात प्रभू श्रीराम यांची भूमिका रणबीर कपूर, सीता मातेची भूमिका साई पल्लवी, रावणाची भूमिका यश, हनुमानाची भूमिका सनी देओल साकारणार आहेत….
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi