Varanasi : एस.एस. राजामौलींच्या आगामी चित्रपटाचं टायटल कन्फर्म! ३००० कोटी

Bigg Boss 19: ‘मालती लेस्बियन आहे…’ बिग बॉस च्या घरात कुनिकाचे मालतीवर गंभीर वक्तव्य
Bigg Boss 19 हा छोट्या पडद्यावरील एक अत्यंत लोकप्रिय आणि वादग्रस्त कार्यक्रम आहे. दरवर्षी या शोमध्ये स्पर्धकांचे वाद, ट्विस्ट आणि ट्रेंडिंग मुद्दे निर्माण होतात, आणि यंदा सुद्धा काहीच वेगळं नाही. नुकत्याच प्रसारित झालेल्या एका एपिसोडमध्ये स्पर्धक कुनिका सदानंदने एक मोठा दावा केला आहे, ज्यामुळे ती सध्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे. या एपिसोडमध्ये कुनिकाने मालती चहरबद्दल गंभीर आरोप करत म्हटलं की, “मालती लेस्बियन आहे”, ज्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. तान्या मित्तलसोबत बोलताना कुनिकाने अचानक मालती चहरच्या लिंग ओळखीबाबत एक असा आरोप केला जो अनेकांना धक्का देणारा होता. कुनिकाने म्हटलं, “मालती मॅडम, मला पूर्ण विश्वास आहे की ती लेस्बियन आहे.” तिच्या या विधानामुळे सर्वत्र चर्चेला सुरुवात झाली आहे. (Bigg Boss 19)

कुनिका आपल्या दाव्यावर ठाम होती, आणि तिच्या बोलण्याच्या शैलीवरून ती आपल्या विधानाला अधिक महत्त्व देत होती. तिने मालतीच्या हावभावांवर देखील शंका व्यक्त केली आणि तिच्या बोलण्याच्या पद्धतीवरून हा निष्कर्ष काढल्याचं सांगितलं. कुनिकाच्या या दाव्यामुळे सोशल मीडिया आणि इंटरनेटवर प्रचंड वाद निर्माण झाला आहे. तिच्या विधानावर अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक नेटकऱ्याने लिहिलं, “नॅशनल टीव्हीवर कोणाच्या सेक्सुअलिटीबद्दल प्रश्न विचारणं चुकीचं आहे. कुनिकाला लाज वाटायला हवी.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “आता वीकेंडला तिला कळेल की काय बोलत आहे.” मालती चहरचे चाहते इथेच थांबले नाहीत; त्यांनी कुनिकाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आणि तिच्या या वर्तनावर निषेध व्यक्त केला.

कुनिकाच्या या विधानामुळे तिचं प्रतिमा आणि करिअर दोन्हीचं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. तिच्या या वक्तव्यामुळे ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल झाली आहे. ‘बिग बॉस 19’च्या या वादग्रस्त एपिसोडमध्ये शोच्या टीआरपीवरही परिणाम होईल, असं सांगितलं जात आहे. ‘बिग बॉस 19’ च्या आगामी वीकेंड का वारमध्ये एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. (Bigg Boss 19)
==============================
हे देखील वाचा: Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !
==============================
सलमान खान याआधी शोचे होस्ट करत होते, पण या आठवड्यात रोहित शेट्टी स्पर्धकांची शाळा घेताना दिसणार आहेत. प्रोमोमध्ये रोहित शेट्टी स्पर्धकांच्या वागण्यावर आणि निर्णयांवर कठोर टीका करत आहेत. विशेषतः, या आठवड्यात अमल मलिक आणि शहबाज बदेशाचा बायस्ड होस्ट म्हणून उल्लेख केल्याबद्दल त्यांची शाळा होईल.‘बिग बॉस 19’मध्ये त्याचा पुढील वीकेंड का वार कसा असणार हे पाहणे महत्त्वाचं आहे, परंतु कुनिकाच्या आरोपांमुळे या शोला अजून एक वादग्रस्त वळण मिळालं आहे.