
“…तर मी मुलं दत्तक घेतली असती”; Renuka Shahane यांचं विधान चर्चेत
मराठी-हिंदी मनोरंजनविश्वात काम करणारी हसरी अभिनेत्री रेणूका शहाणे (Renuka Shahane) लवकरच उत्तर या नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे… करिअरमध्ये अव्वल असणाऱ्या रेणूका शहाणेची पर्सनल लाईफही फार आनंदी आहे… रेणूका यांनी आशुतोष राणा (Aashutosh Rana) यांच्यासोबत २००१ मध्येल लग्नगाठ बांधली होती… काही वर्षांनी त्या दोघांना शौर्यमन आणि सत्येंद्र अशी दोन मुलं झाली… नुकत्याच एका मुलाखतीत रेणूका यांनी मातृत्वाबद्दल फार महत्वाचं विधान केलं… राणांशी लग्न झालं नसतं तर मी मुलं दत्तक घेतली असती असं विधान त्यांनी केलं… नेमकं रेणूका काय म्हणाल्या जाणून घेऊयात…

रेणुका शहाणे यांनी नुकतीच ‘आरपार’ला मुलाखत दिली. या मुलाखती दरम्यान रेणुका म्हणाल्या की, “माझी वेगळी काही स्वप्न नव्हतीच. लहानपणापासून मला मुलं हवीच होती. लोकं मला जेव्हा माझं Ambition विचारायचे तेव्हा मी सांगायचे मला मुलं हवी आहेत. खरंच हीच माझी मनापासून इच्छा होती. कारण, कामाच्या बाबतीत सांगायचं झालं तर सगळ्या गोष्टी करिअरमध्ये आपोआप घडत गेल्या. जे काम आलं ते मी करत गेले. पण, मातृत्वाबद्दल माझ्या डोक्यात सगळ्या गोष्टी क्लिअर होत्या. जर मला राणाजी भेटले नसते तर मी मुलं दत्तक घेतली असती”… (Bollywood News)

पुढे रेणूका म्हणाल्या की, “मी ३६ वर्षांची होते तेव्हा मला पहिलं बाळ झालं. मी माझ्या मुलांच्या सगळ्या गोष्टी करण्यात इतकी गुंतले की, इतर काही करण्यासाठी माझ्याकडे एनर्जीच उरायची नाही. माझी दोन्ही मुलं रोज शाळेत जाताना मला त्रास द्यायची. शाळेची कितीतरी वर्ष मी नुसती मोजत होते की, ही वर्ष आता कधी संपतील. पण, आता ते दिवस पुन्हा अनभवू शकत नाही. माझा धाकटा मुलगा मला सोडायचाच नाही. सतत माझ्या कमरेवर असायचा आणि मी त्याला घेऊन फिरायचे. नंतर अचानक एक दिवस त्याची ती सवय सुटली आणि मग मला चुकल्यासारखं वाटलं. या सगळ्या मातृत्वाच्या प्रक्रिया आपल्याला अनुभवल्यावरच कळतात”…
================================
================================
रेणूका शहाणे नुकत्याच ‘देवमाणूस’ चित्रपटात महेश मांजरेकरांसोबत झळकल्या होत्या… या व्यतिरिक्त ‘बकेट लिस्ट’, ‘जाणिवा’, ‘सैलाब’, ‘हम आपके है कौन!’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. आता उत्तर चित्रपटात त्या अभिनय लक्ष्मीकांत बेर्डेसोबत स्क्रिन शेअर करणार आहेत… (Renuka Shahane Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi