
“…म्हणून Laxmikant Berdeने लेकाचं नाव अभिनय ठेवलं”; रेणूका शहाणेंनी सांगितला नावामागचा किस्सा
हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीत विविधांगी भूमिका साकारणाऱ्या रेणूका शहाणे सध्या त्यांच्या आगामी ‘उत्तर’ (Uttar movie) या चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसत आहेत… वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये रेणूका शहाणे यांनी त्यांचा सिनेसृष्टीतला प्रवास आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे…. रेणूका शहाणे यांनी दिग्गज कलाकारांसोबत काम केलं आणि त्यापैकीच एक महत्वाचं नाव म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे… ‘हम आपके है कौन!’ चित्रपटात रेणूका शहाणेंनी लक्ष्मीकांत यांच्यासोबत स्क्रिन शेअर केली होती… त्यांच्यासोबत काम करतानाच अनुभव सांगताना रेणूका यांनी लक्ष्मीकांत यांनी त्यांच्या मुलाचं नाव अभिनय का ठेवलं याचा उलगडा केला आहे… (Renuka Shahane & Laxmikant Berde)

रेणुका शहाणेंनी ‘आरपार’ला दिलेल्या मुलाखतीत किस्सा सांगताना म्हटलं की, “लक्ष्याला जेव्हा मुलगा झाला, तेव्हा लक्ष्यानं त्याचं नाव अभिनय ठेवलं. आणि त्याच्या नावामागची गोष्ट लक्ष्यानं मला सांगितली होती. लक्ष्यानं हे नाव ठेवण्यामागचं कारण असं सांगितलं की सगळे म्हणतील, लक्ष्याचा अभिनय उत्तम आहे…”
रेणुका पुढे बोलताना म्हणाल्या की, “कुठेतरी कॉमेडी करता करता कलाकाराला तेवढा सन्मान मिळत नाही. दुर्दैव आहे हे… कारण कलाकार म्हणून कॉमेडी करणं खूप कठीण आहे. पण जे ड्रामाटिक कलाकार असतात त्यांच्याबद्दल एक वलय असतं की, उत्तम कलाकार आहेत वगैरे… लक्ष्यानं इमोशनल भूमिका सुद्धा खूप अप्रतिम केल्या आहेत. पण त्याला वाव मिळाला नाही. त्यामुळे त्याला कुठेतरी वाटलं की, लक्ष्याचा अभिनय उत्तम आहे, मस्त आहे…” (Abhinay Laxmikant Berde)
================================
हे देखील वाचा : “…तर मी मुलं दत्तक घेतली असती”; Renuka Shahane यांचं विधान चर्चेत
================================
दरम्यान, रेणुका शहाणे आणि अभिनय बेर्डे लवकरच ‘उत्तर’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे… आई-मुलाच्या नात्याची संवेदनशील कथा मांडणाऱ्या या चित्रपटात रेणुका शहाणे आईच्या भूमिकेत तर अभिनय बेर्डे मुलाच्या भूमिकेत आहे. ऋता दुर्गुळेची सुद्धा यात महत्त्वाची भूमिका असणार आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट १२ डिसेंबरपासून रूपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi