
“तुम्हारे पटाखे खत्म हो गए, तो में धमाका शुरु करु”!; रणवीर सिंगच्या Dhurandhar चा ट्रेलर रिलीज
बऱ्याच दिवसांपासून दिग्दर्शक आदित्य धर आणि अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) यांच्या ज्या चित्रपटाची चर्चा सुरु होती, अखेर त्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे… होय… सत्य घटनांवर आधारित असेलल्या ‘धुरंधर’ (Dhurandhar Movie Trailer) चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्या समोर आली असून या मल्टीस्टारकास्ट चित्रपटातील प्रत्येक कलाकाराचा अभिनय थरकाप उडवणारा आहे…
धुरंधर चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात अर्जून रामपाल (Arjun Rampal) पासून होते… १९७१ च्या युद्धानंतर त्याच्या मनात भारताबद्दल प्रचंड राग आहे… आणि याच रागात तो त्याच्या गोडाऊनमधील एका माणसाची जी अवस्था करतो ते पाहून डोळे विस्फारतात… त्यानंतर दिसतो तो आर माधवन (R Madhvan)… पाकिस्तानच्या स्वप्नातही त्यांना आपल्याबद्दल भीती वाटली पाहिजे असा डायलॉग म्हणत असताना तो कुठल्यातरी मिशनची तयारी करतोय हे स्पष्ट होतं… यानंतर एन्ट्री होते खुनशी अक्षय खन्ना (Akshaye Khannaa) याची… (Bollywood News)

या तीन तगड्या कलाकारांच्या एन्ट्रीनंतर येतो संजय दत्त (Sanjay Dutt)… धडकी भरवणारा पोलीस ऑफिसर यात तो साकारताना दिसतोय. आणि ट्रेलरच्या सर्वात शेवटी येतो मेन हिरो अर्थात रणवीर सिंग (Ranveer Singh)… ”तुम लोगो के पटाखे खत्म हो गए तो में धमाका शुरु करु”, असं बोलत रणवीर पाकिस्तान शहरातील काही भाग जाळताना दिसतो… आता नेमकी धुरंधरमधील ही ५ पात्र कोणत्या मिशनवर आहेत आणि सत्य घटनेवर आधारित ही कता कोणती आहे हे आपल्याला लवकरच कळणार आहे…
================================
हे देखील वाचा : Akshay Khanna : ‘छावा’त औरंगजेब साकारण्यासाठी अक्षयने ठेवली होती अट!
================================
रणवीर सिंग, अक्षय खन्ना, संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर माधवन अशी तगडी स्टारकास्ट असणाऱ्या ‘धुरंधर’ चित्रपटाचं दिग्दर्शन ‘उरी’ चित्रपट फेम आदित्य धर यांनी केलं आहे… देशभरात हा चित्रपट ५ डिसेंबर २०२५ रोजी रिलीज होणार आहे.. (Dhurandhar Movie Cast)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi