
Shiv Thakare याचं मुंबईतील घर जळून खाक; सुदैवाने अभिनेता बचावला
मराठी ‘बिग बॉस’च्या सीझन २ चा विजेता शिव ठाकरे याच्याबद्दल एक महत्वाची बातमी समोर आली आहे.. शिवच्या मुंबईतील घराला भीषण आग लागली असून त्याचं संपूर्ण घर जळून खाक झालं आहे… सोशल मिडियावर त्याच्या घराचा व्हिडिओ व्हायरल झाला असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही… मात्र या आगीत शिवच्या घराचं मोठं नुकसान झालं आहे. (Shiv Thakare)
विरल भय्यानी या इन्स्टाग्राम पेजवरुन शिव ठाकरेच्या जळालेल्या घराचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे… मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील कोलते पाटील वेर्वे बिल्डिंगमध्ये शिवचं घर आहे… अद्याप आगीचं कारण समोर आलं नसून ज्यावेळी आग लागली तेव्हा शिव घरी नव्हता… आग लागल्याचं कळताच अग्निशामन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या… काही वेळात आग आटोक्यात जरी आणण्यात अग्निशामन दलाला यश आलं असलं तरी त्याच्या घराचं मोठं नुकसान झालं आहे… (Entertainment News)
================================
================================
शिव ठाकरेच्या टीमनं आगीच्या दुर्घटनेप्रकरणी एक निवेदन जाहीर केलं आहे. त्यामध्ये त्यांनी माहिती दिली आहे की, “आज सकाळी शिव ठाकरेच्या मुंबईतील कोलते पाटील व्हेर्व इमारतीतील घराला भीषण आग लागली. त्यामुळे अभिनेत्याला मोठ्या कठीण परिस्थितीचा सामना करावा लागलाय. या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही, पण, घराचं मोठं नुकसान झालं आहे”… दरम्यान, शिव ठाकरे याने मराठी बिग बिस सीझनच्या दुसऱ्या सीझनचं विजेतेपद पटकावलं होतं… इतकंच नाही तर तो ‘बिग बॉस हिंदी’ आणि ‘खतरों के खिलाडी’मध्येही सहभागी झाला होता…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi