‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकेतून ‘या’ अभिनेत्याची एक्झिट; ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता

Asha Marathi Movie Teaser: बाईपणाच्या संघर्षाची गोष्ट दाखवणाऱ्या रिंकू राजगुरुच्या ‘आशा’ चा टीजर पदर्शित !
मराठी चित्रपटसृष्टीत नेहमीच नव्या आणि समर्पित विषयांची नवनवीन शोध घेणाऱ्या निर्मात्यांचे सिनेमे पाहायला मिळतात. याच कडीतील एक महत्त्वाचा चित्रपट म्हणजे ‘आशा’. “बाई अडलीये… म्हणूनच ती नडलीये” अशा प्रभावी टॅगलाइनसह प्रदर्शित झालेल्या ‘आशा’ चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाचे विशेष म्हणजे त्याची कथा महिलांच्या संघर्ष आणि आत्मविश्वासावर आधारित आहे. याच्या टीझरने प्रेक्षकांमध्ये नवा उत्साह निर्माण केला असून, चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख १९ डिसेंबर जाहीर करण्यात आली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच ‘आशा’ ने महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे. ६१व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाने चार पुरस्कारांची कमाई केली आहे, ज्यामुळे चित्रपटाची महत्त्वाची गुणवत्ता आणि विषयावरील प्रगल्भतेची दखल घेतली गेली आहे. या पुरस्कारांनी ‘आशा’ चे महत्त्व आणखी वाढवले आहे, आणि आता प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दलच्या उत्सुकतेची लाट दिसून येत आहे.(Asha Marathi Movie Teaser)

‘आशा’ हा चित्रपट फक्त एक मनोरंजनाचा साधन नाही, तर तो महिलांच्या संघर्ष, त्यांचा आत्मविश्वास आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी यावर आधारित आहे. चित्रपटाची कथा एक आरोग्य सेविकेच्या भूमिकेतील ‘आशा’च्या जीवनावर केंद्रित आहे, जी आपले कुटुंब सांभाळून समाजासाठी कार्य करते. आशा, या पात्राची भूमिका रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) साकारत आहे. तिच्या डोळ्यांतून संघर्षाची जाणीव आणि पावलांतून त्या संघर्षाचा परिणाम दिसतो. तिच्या पात्रातून प्रेक्षकांना एक आशेची, धैर्याची आणि अडचणींचा सामना करत उभा राहण्याची प्रेरणा मिळेल. ‘आशा’ चित्रपटात रिंकू राजगुरूच्या प्रमुख भूमिकेसोबतच सायंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास शिरसाट, दिशा दानडे, दिलीप घारे आणि हर्षा गुप्ते यांसारखे अनेक प्रमुख कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. या कलाकारांचा अभिनय आणि प्रत्येकाची भूमिका चित्रपटाच्या गतीला एक वेगळी दिशा देईल. विशेषत: रिंकूने साकारलेली आशा ही महिला केवळ आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी नाही, तर ती एक संघर्ष करणारी, स्वतःच्या स्वप्नांसाठी लढणारी आणि समाजाच्या विकासासाठी काम करणारी महिला आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे दिपक पाटील सांगतात की, “‘आशा’ हा चित्रपट फक्त आरोग्य सेविकांचा नाही, तर प्रत्येक अशा महिलांचा आहे ज्या घर सांभाळून, घरासाठी घराबाहेर पडतात. तो त्यांच्या संघर्षांचा, त्याच्या स्वप्नांचा आणि जिद्दीचा चित्रपट आहे. मराठी प्रेक्षकांना नवनवीन विषयांची आणि खऱ्या आयुष्यावर आधारित कथा आवडतात, आणि मला खात्री आहे की ‘आशा’ प्रेक्षकांना एक वेगळी आणि अनोखी गोष्ट देईल.”(Asha Marathi Movie Teaser)
==============================
==============================
‘आशा’ चित्रपट एक स्त्रीच्या संघर्षाची आणि तिच्या समाजातील स्थानाची खूपच प्रेरणादायक कथा सांगतो. महिला कोणत्याही क्षेत्रात काम करत असल्या तरी त्यांचा सामना त्यांना रोजच्याच अडचणींशी असतो, आणि या चित्रपटात त्या संघर्षाचा चांगला प्रतिविंब पाहायला मिळेल. प्रत्येक महिला तिच्या जिद्दीला आणि ताकदीला मागे ठेवून एक मोठे कार्य करीत असते, आणि ‘आशा’ ह्याच प्रेरणादायक दृषटिकोनातून बनवला गेला आहे. या चित्रपटामुळे नक्कीच एक नवीन जागरूकता येईल, आणि समाजातील प्रत्येक स्त्रीला आपल्या सामर्थ्याचा पुनः शोध घेण्याची प्रेरणा मिळेल यात शंका नाही.