
Heeramandi 2 ; संजय लीला भन्साळींच्या नव्या सीझनकडून प्रेक्षकांना मोठी अपेक्षा!
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हीरामंडी’ (Heeramandi) ही वेब सीरीज २०२४ मध्ये रिलीज झाली होती… भारतीय स्वातंत्र्य चळवळीदरम्यान लाहौरमधील डायमंड बाजार आणि या बाजारीतल तवायफ यांची कहाणी या सीरीजमधून मांडण्यात आली होती… भन्साळींचं ओटीटीवर दिग्दर्शकिय पदार्पण असणाऱ्या या सीरीजचा आता दुसरा भाग म्हणजेच हीरामंडी २ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे… (Web Series)

‘हीरामंडी’ या सीरीजचे लेखक विभू पुरी यांनी एका मुलाखतीत ‘हीरामंडी २’ चं कथालिखाण सुरु असल्याचं सांगितलं आहे… त्यामुळे देशाच्या स्वातंत्र्यासह आपल्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या डायमंड बाजारातील या तवायफांचं पुढचं आयुष्य कसं असणार? नवी पात्र यात एड होणार का याकडे आता चाहत्यांचं विशेष लक्ष लागलं आहे… (Heeramandi 2)

हीरामंडी या सीरीजमध्ये मनिषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, रिचा चड्डा, अदितीराव हैदरी, संजीदा शेख, शर्मिन सेहगल, फरदीन खान यांच्या प्रमुख भुमिका होत्या.. आता हीरामंडी २ मध्ये काही नवीन पात्रांची एन्ट्री होणार का? आणि कथानक काय असणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे… (Entertainment News)
================================
हे देखील वाचा : Shahrukh Khan : संजय लीला भन्साळी, ‘देवदास ‘आणि बरंच काही….
================================
दरम्यान, संजय लीला भन्साळी यांच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर Love & War हा चित्रपट ते घेऊन येणार आहेत… या चित्रपटात आलिया भट्ट, विकी कौशल आणि रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत… (Sanjay Leela Bhansali Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi