
‘संगीत देवबाभळी’ फेम Shubhangi Sadavarte पुन्हा अडकणार लग्नबंधनात; 3 महिन्यांआधीच झाला होता डिवोर्स
मराठी रंगभूमी आणि मालिकांमधून स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री शुभांगी सदावर्ते (Shubhangi Sadavarte) पुन्हा एकदा तिच्या आयुष्यात नवीन सुरुवात करण्यासाठी तयार झाली आहे. काही महिन्यांपूर्वीच तिचा संगीतकार आनंद ओक याच्यासोबत झालेल्या डिवोर्सची बातमी समोर आली होती. दोघांनी मिळून शांतपणे वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सोशल मीडियावर जाहीर केलं होतं. आता त्यानंतर फार काळ न जाता शुभांगी पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकणार असल्याची अधिकृत पुष्टी मिळाली आहे.(Actress Shubhangi Sadavarte)

शुभांगीने तिच्या इंस्टाग्रामवर तिच्या केळवणाचा एक सुंदर व्हिडीओ शेअर केला असून तो क्षणार्धात व्हायरल ही झाला आहे. “जुळली गाठ गं” असं कॅप्शन देत तिने तिच्या नव्या आयुष्याची सुरुवात जवळ आल्याची झलक चाहत्यांना दिली आहे. या व्हिडीओमध्ये शुभांगी तिच्या जवळच्या मैत्रिणींंसोबत, नातेवाईकांसोबत आनंदात दिसत आहे. पारंपरिक वातावरण, तिचा आनंदी चेहरा आणि तिला साजरे केलेले केळवण या सर्वांनी चाहत्यांना भुरळ घातली आहे. तिच्या नव्या आयुष्याबद्दलचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.

शुभांगीचा दुसरा विवाह मराठी मनोरंजन क्षेत्रातील ओळखीच्या नावासोबत होणार आहे. तिचा होणारा नवरा सुमित म्हशीलकर (Sumit Mhashilkar)हा मराठी मालिकांचा निर्माता असून ‘ती प्रेमाची गोष्ट’ या मालिकेचा तो निर्माता आहे. शुभांगी आणि सुमित यांची ओळख नेमकी कधी आणि कुठे झाली याबद्दल अधिकृत माहिती नसली तरी, त्यांच्या जवळच्या लोकांच्या म्हणण्यानुसार त्या दोघांमध्ये गेल्या काही काळात चांगली नात जुळल. एकमेकांबद्दलचा आदर, समजूतदारपणा आणि मैत्री यातूनच त्यांच्या नात्याची सुरुवात झाली असे म्हटले जाते. शुभांगीने जाहीर केलेल्या व्हिडीओमुळे त्यांच्या लग्नाच्या तयारीचे संकेत अधिक स्पष्ट झाले आहेत. सध्या शुभांगी आणि सुमित यांच्या लग्नाबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये जबरदस्त उत्सुकता आहे.(Actress Shubhangi Sadavarte)
============================
============================
शुभांगीचे पहिलं लग्न संगीतकार आनंद ओक (Anand Oak) याच्यासोबत झालं होतं. आनंद ओक हे ‘संगीत देवबाभळी’ (Sangeet Devbhabhali) या नाटकाचे संगीत दिग्दर्शक आहेत. कोरोना काळात झालेलं हे लग्न सोशल मीडियावर खूप चर्चेत आलं होतं. दोघांनी काही वर्षे एकत्र घालवली, पण कालांतराने मतभेद वाढत गेले आणि त्यांनी परस्पर सहमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये दोघांनी एकमेकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली होती. “आम्ही काही वर्षांपूर्वीच वेगळे झालो होतो, आता हा निर्णय सार्वजनिक करण्यास योग्य वेळ आहे,” असं त्यांनी म्हटलं होतं. भविष्यात कामाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र काम करू शकतो, असेही आनंद ओक यांनी नमूद केले होते.