आई–मुलींच्या नात्याच्या नाजूक छटा उलगडणारा Tighi चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

“मला स्वप्न मराठीतच पडतात”; नाव न घेता Nana Patekar यांनी पिळगांवकरांचे पिळले कान?
ट्रोलिंग शब्द जरी लहान असला तरी त्याचा इम्पॅक्ट फार मोठा असतो… शिवाय, सोशल मिडीया आणि ट्रोलींग यांचं गणित इतकं जुळलं आहे की एखाद्या माणसाने किंवा सेलिब्रिटीने काही म्हणावं आणि ते लोकांनी ट्रोल करावं…. या ट्रोलिंगचा भाग ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर (Sachin Pilgoankar) कायमच असतात हे त्य मान्य करावंच लागेल… काहीच दिवसांपूर्वी एका उर्दू कार्यक्रमात त्यांनी, “माझी मातृभाषा जरी मराठी असली तरी विचार मी उर्दू भाषेत करतो आणि उर्दू भाषेसोबतच झोपतो”, असं त्यांनी विधान केलं होतं… यावर नेटकऱ्यांनी तर त्यांच्यावर निशाणा साधलाच पण आता ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनीही एका कार्यक्रमात नाव न घेता मला मराठीत स्वप्न पडतात असं म्हणत सचिनजींना नाव न घेता ट्रोल केलंय असं म्हटलं जातंय… काय घडलंय जाणून घेऊयात… (Marathi Entertainment News)

नाना पाटेकर (Nana Patekar) म्हणजे एकदम स्पष्टवक्तेपणा असणारा कलाकार…. आपले विचार ठामपणे मांडणारे नाना कायमच त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात… नुकत्याच एका कार्यक्रमात त्यांनी भाषणाची सुरुवात करताना म्हटलं की, “मराठीमध्ये बोलताना शब्द तुम्हाला शोधावे लागत नाहीत… ते सहज आणि पटकन येतात… त्याचं कारण असं की मला स्वप्न मराठीतच पडतात…त्यामुळे ती माझी मातृभाषा आहे.. पण तरीही सगळ्यांना कळावं यासाठी मी हिंदीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो”… त्यामुळे नक्कीच मराठी भाषेचा केलेल्या उल्लेख हा सचिन पिळगांवकर यांच्या उर्दू भाषेच्या विधानाला दिलेलं उत्तर होतं यात शंकाच नाही…

आता जरा थोडं मागे जाऊन नेमकं सचिनजी काय म्हणाले होते त्याचं रिव्हीजन करुयात… तसं पाहायला गेलं तर कोणत्याही कार्यक्रमात जेव्हा सचिनजी जातात तेव्हा एक तरी उर्दू शायरी ते सादर करतातच आणि त्यावरुनच त्यांचं उर्दू भाषेवरील प्रेम दिसून येतं.. असंच ‘बहार ए उर्दू’ या कार्यक्रमात त्यांनी म्हटलं होतं की, “माझी मातृभाषा मराठी आहे, पण मी विचार उर्दू भाषेतून करतो. मला माझ्या बायकोने किंवा इतर कोणीही रात्री 3 वाजता जरी उठवलं, तरी मी उर्दू भाषेत बोलूनच जागा होतो. मी उर्दूतून केवळ जागा होत नाही, तर मी उर्दू भाषेसोबत झोपतोही. उर्दू एक अशी सवत आहे जी माझ्या बायकोला आवडते. माझं उर्दू भाषेवरील प्रेम माझ्या बायकोला आवडतं”… त्यामुळे आता सचिन पिळगांवकर त्यांच्या उर्दू भाषेच्या वक्तव्यावर नाना पाटेकरांनी मारलेल्या या टोमण्यावर काही प्रत्युत्तर देणार का? हे जाणून घेण्याची उत्सुकता लोकांना नक्कीच लागली असेल…
================================
हे देखील वाचा : Nana Patekar : “देव मानत नाही अशातला भाग नाही पण…”; पाटेकर देवळात का जात नाहीत?
================================
दरम्यान, नाना पाटेकर यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर हाऊसफुल्ल ५ चित्रपटात नुकतेच ते झळकले होते… त्यासोबतच ‘वनवास’, ‘ओले आले’, ‘द वॅक्सिन वॉर’, ‘काला’, ‘नटसम्राट’, ‘हेमलकासा’, ‘वेलकम बॅक’ अशा बऱ्याच मराठी, हिंदी आणि साऊथ चित्रपटातही त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत… तर, सचिन पिळगांवकर यांचा ‘नवरा माझा नवसाचा २’ हा चित्रपट २०२४ मध्ये रिलीज झाला होता…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi