
Prajakta Gaikwad Wedding: रिसेप्शनमधल्या ‘ग्रँड एन्ट्री’ ने अभिनेत्री झाली ट्रोल !
Prajakta Gaikwad आणि शंभुराज खुटवड (Shambhuraj Khutwad) यांच्या विवाह सोहळ्यामुळे सध्या सोशल मीडियावर चांगला चर्चेचा विषय तयार झाला आहे. 2 डिसेंबर २०२५ रोजी पार पडलेल्या या लग्नानंतर प्राजक्ताने तिच्या पतीसह एका भव्य नंदीवर स्वार होऊन रिसेप्शनमध्ये एन्ट्री घेतली. तिच्या या “ग्रँड एन्ट्री”ने अनेकांचे लक्ष वेधून घेतले, पण काही लोकांनी या एन्ट्रीवर नाराजी ही व्यक्त केली आहे.(Prajakta Gaikwad Wedding)

प्राजक्ताची एन्ट्री किती थाटात होती हे पाहून अनेक नेटकऱ्यांनी तिला कौतुक केलं, तर काहींनी तिच्या या कृतीवर टीका केली.अनेक नेतकऱ्यांनी प्राजक्ता च्या या कृतीवर नाराजी व्यक्त करत ‘हे फार चुकीचं आहे, देवांची मस्करी केली आहे’ असं म्हटलंय. त्याचप्रमाणे, काही लोकांनी ‘रिसेप्शन आहे की सर्कस?’ असा प्रश्न ही विचारलाय. नेटकऱ्यांनी प्राजक्ताला सल्ला दिला की अशा प्रकारे वेगळ्या थीमसह तिचं लग्न पार पडायला पाहिजे होतं, असेही काहींनी म्हटलं.दरम्यान, प्राजक्ता आणि शंभुराज यांच्या लग्नाची सुंदरता मात्र सर्वानाच आकर्षित झाली. रिसेप्शनमध्ये प्राजक्ता गायकवाड लाल रंगाच्या भरजरी साडीमध्ये सुंदर दिसत होती, तर तिच्या पतीने लाल रंगाच्या साडीला शोभेल अशी शेरवानी परिधान केली होती. यावरून दोघांचा लुक तर भन्नाट होता, आणि दोघांच्या जोडीला पाहुन कोणाच्याही तोंडून Made For Each Other असच येईल अशी दोघांची जोडी दिसत होती.

प्राजक्ता आणि शंभुराज यांचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. पण प्राजक्ताच्या रिसेप्शनसाठी करण्यात आलेल्या ग्रैंड मोठ्या एन्ट्रीवर नेटकऱ्यांची दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया मिळाली. पण अस जरी असल तरी, त्यांचं लग्न एक ऐतिहासिक क्षण ठरला आणि त्याला शुभेच्छांचा ओघ अजूनही सुरूच आहे. (Prajakta Gaikwad Wedding)
================================
================================
काही लोकांच्या मते, जरी एंटरटेनमेंटच्या दृष्टिकोनातून पाहता प्राजक्ताने विशेष एन्ट्री केली असली, तरी समाजातील धार्मिक आणि सांस्कृतिक जाणीवही महत्त्वपूर्ण असतात अस ही मत आहे. आता हे प्रकरण वाढत की लोक काही दिवसात हे विसरुन जातात हे पाहण महत्वाच असेल.