
Hemant Dhomeच्या शाळेत पार पडला ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चा म्युझिक लॉंच सोहळा
दिग्दर्शक हेमंत ढोमे यांचा आगामी ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चित्रपट २०२६ च्या सुरुवातीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी माध्यम शाळांना वाचवण्यासाठीचा चित्रपटातून केला जाणारा त्यांचा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे. अशातच या चित्रपटातील दुसरं गाणं रिलीज झालं आहे. सुप्रसिद्ध साहित्यिक, लेखक रत्नाकरी मत्करी यांचं ‘स्वर्गात आकाशगंगा’ हे गाणं एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांच्या समोर येणाक आहे. शाळेतल्या आठवणींना उजाळा देणारं गाणं आगळ्या-वेगळ्या पद्धतीने हेमंत यांच्या अभिनव ज्ञानमंदिर प्रशालेतील पटांगणातात सादर झालं.
दरम्यान, या खास सोहळ्यात चित्रपटातील कलाकार हजारो विद्यार्थ्यांसोबत गाण्यावर थिरकले. विद्यार्थ्यांची ऊर्जा आणि मैदानात दुमदुमलेलं आनंदी वातावरण यामुळे हा गाण्याचा अनावरण सोहळा धमाकेदार ठरला. सुप्रसिद्ध साहित्यिक स्व. रत्नाकर मतकरी यांनी लिहिलेलं हे कालातीत गीत आजही प्रत्येक शाळकरी विद्यार्थ्याच्या मनात घर करून आहे. संगीतकार हर्ष-विजय यांनी या लोकप्रिय गाण्याला आधुनिक आणि नॉस्टॅल्जिक असा सुंदर स्पर्श देत नव्याने सादर केलं आहे. गायक रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांनी हे गाणं गायलं आहे.

आपल्या भावना मांडताना दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाले की, ”वडिलांच्या पोलीस खात्यातील नोकरीमुळे माझे पाचवी ते सातवी पर्यंतचे शिक्षण याच शाळेत झाले. आज सिनेक्षेत्रात काम करताना तो दिवस आठवतो, जेव्हा मी पहिल्यांदा नाटकात काम केलं, जे आपल्या शाळेच्या मंचावर होतं. दिवंगत परांजपे सरांनी हाताला धरून मला त्या मंचावर उभं केलं होतं. सरांचे आणि शाळेचे हे उपकार मी कधीच फेडू शकणार नाही. मी कायमचा त्यांचा ऋणी असेन. आपल्या शाळेसाठी काही करावे, माझी शाळा कुठली, हे अभिमानानं सांगावं, असं कायमच वाटायचं आणि या चित्रपटाच्या निमित्तानं ही संधी मला मिळाली. माझ्या चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा याच शाळेत करण्याची माझी इच्छा पूर्ण केल्याबद्दल मी शाळेचा मनापासून आभारी आहे. ”
================================
हे देखील वाचा : पाकिस्तानात शूट झाला आहे का Ranveer Singh याचा ‘धुरंधर’?
================================
दरम्यान, ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चित्रपटात सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर आणि मराठी चित्रपटात पहिल्यांदाच पदार्पण करणारी प्राजक्ता कोळी अशी दमदार स्टारकास्ट झळकणार आहे. हा चित्रपट १ जानेवारी २०२६ रोजी रिलीज होणार आहे. चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हेमंत ढोमे यांचे असून, क्षिती जोग निर्माती आहे. तर सहनिर्माते विराज गवस, उर्फी काझमी (क्रेझी फ्यू फिल्म्स) आणि अजिंक्य ढमाळ आहेत.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi