
‘Mi Honar Superstar Chote Ustad’ चा ४ सीजन लवकरच; साजिरी जोशी करणार सूत्रसंचालन !
आता “मी होणार सुपरस्टार” (Mi Honar Superstar) चा चौथा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या पर्वात महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेले छोटे उस्ताद आपल्या सुरांच्या जादूने सर्वांना आकर्षित करणार आहेत. खास गोष्ट म्हणजे, या सीझनचं सूत्रसंचालन नवोदित अभिनेत्री साजिरी जोशी करणार आहे, जी सध्या एका सिनेमात आणि वेब सीरिजमध्ये अभिनय करत आहे आणि तिच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. (Mi Honar Superstar Chote Ustad 4)

साजिरी जोशी (Sajiri Joshi) “मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ४” मध्ये होस्ट म्हणून टेलिव्हिजनवर पदार्पण करणार आहे. साजिरीने या शोबद्दल सांगताना म्हटलं की, “माझ्या नवीन भूमिकेसाठी मी खूप उत्साहित आहे. “मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद” हा एक खूपच जबरदस्त शो आहे. याआधीच्या तिन्ही पर्वांनी प्रचंड यश मिळवलं आहे. चौथ्या पर्वाचे सूत्रसंचालन मला मिळणं हे माझं सौभाग्य आहे. सगळेच स्पर्धक खूप टॅलेंटेड आहेत, आणि त्यांच्या गाण्यांना ऐकण्याची, त्यांच्या स्वप्नांना जाणून घेण्याची मला खूप उत्सुकता आहे.”

“मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद” च्या चौथ्या सीझनाची थीम “सुरांची स्वप्ननगरी” ठेवण्यात आली आहे. साजिरीने याबद्दल सांगितलं की, “स्वप्नं प्रत्येकासाठी महत्त्वाची असतात आणि जादू अनुभवायला प्रत्येकालाच आवडतं. त्यामुळे या जादुई नगरीची सफर करताना प्रत्येक स्पर्धकाचा आवाज ऐकण्याची एक वेगळीच ओढ आहे.”(Mi Honar Superstar Chote Ustad 4)
=============================
हे देखील वाचा: बिग बॉसचा विजेता Suraj Chavan च्या लग्नानंतर ‘छोटा पुढारी’ ही चढणार बोहल्यावर; व्हिडिओमुळे चर्चेला उधाण
=============================
मी होणार सुपरस्टार चा ३व्या सीझनचा विजेती होती धनश्री कोठारी. धनश्रीने तिच्या आवाजाच्या ताकदीने आणि अलीकडील गाण्यांच्या सादरीकरणाने या सीझनमध्ये सर्वांची मने जिंकली होती आणि तिच्या आवाजामुळेच तिला सीझनचा विजेता म्हणून घोषित करण्यात आलं. या सीझनमध्ये अँकिंगची जबाबदारी सिद्धार्थ चांदेकरकडे होती तर सुरेश वाडकर आणि आदर्श शिंदे यांनी हा शो जज केला होता. सुरेश वाडकर सर आणि आदर्श शिंदे हे दोघेही लोकप्रिय गायक आहेत आणि त्यांचं अँकिंग कौशल्य देखील खूप आवडले. “मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद” चा ४ सीझन ३ डिसेंबरपासून रोज रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर पाहता येईल.