
करिश्मा कपूरच्या प्रेमात एकेकाळी वेडा होता Akshaye Khanna?
बॉलिवूडमध्ये कोणता कलाकार कोणाला डेट करतोय? किंवा कुणाचं कुणाशी नाव जोडलं जातंय याचा काहीच नेम नसतो… फिल्मी दुनियेत अशी बरीचशी अफेअर्स खरी होती तर काही खोटी… काहीचं जुळलेली लग्न मोडली तर काहींनी लोकांच्या नाकावर टिच्चून लग्न केलं… याच यादीत करिश्मा कपूर (Karishma Kapoor) आणि अक्षय खन्ना (Akshaye Khanna) यांचंही नाव होतं… असं म्हणतात अक्षय खन्ना आणि करिश्मा कपूर रिलेशनशिपमध्ये होते… परंतु, त्यांचं हे नातं फार काळ टिकलं नाही… सध्या सोशल मिडियावर याच अॅंगलला बढावा देणारा करिश्माच्या लग्नातील व्हिडिओ व्हायरल झाला असून यात अक्षय करिश्माच्या हातातचं चुंबन घेताना दिसतोय… नेमकं काय कहोतं प्रकरण जाणून घेऊयात… (Bollywood News)
एकेकाळी करिश्मा कपूर हिचं खरं तर बऱ्याच अभिनेत्यांसोबत नाव जोडलं गेलं… पण अक्षय खन्ना आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्यासोबतच्या नात्याची विशेष चर्चा झाली… दोघे रिलेशनमध्ये होते आणि असही म्हटलं गेलं होतं की हे ते लग्न करणार होते. शिवाय, करिश्माचे वडील रणधीर कपूर यांनीसुद्धा त्यांच्या नात्याला स्वीकारलं होतं. परंतु, अभिषेक बच्चनप्रमाणे याही नात्यात करिश्माच्या आईमुळे त्यांचं नातं तुटलं.. बबिता कपूर यांना करिश्माच्या करिअर आणि अक्षयच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबाबत संशय होता. त्यामुळे हे नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नव्हतं. (Karishma Kapoor affiars)

कालांतराने, करिश्मा कपूर हिने २९ सप्टेंबर २००३ मध्ये बिझनेसमन संजय कपूरशी लग्न केलं… गुरुद्वारामध्ये विवाहविधी पार पडल्यानंतर कृष्णराज बंगल्यात रिसेप्शन झालं… करिश्माच्या या शाही रिसेप्शनला बॉलिवूडपासून राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. याच पाहुण्यांमध्ये अक्षय खन्नाही होता. करिश्माच्या आयुष्यात एकेकाळी महत्वाचं स्थान असणाऱ्या अक्षयने फक्त त्या लग्नात हजेरीच लावली नाही तर अत्यंत आदरपूर्वक आणि सौम्यतेनं त्याने करिश्माला शुभेच्छा दिल्या होत्या… करिश्माच्या रिसेप्शनच्या या व्हिडीओमध्ये अक्षयने जेव्हा तिची भेट घेतली होती तेव्हा तिच्या हातावर अलगद किस करत तिला शुभेच्छा दिल्या होत्या… आजही तो व्हिडिओ पाहताना एका अपूर्ण नात्याला अत्यंत सुंदर पद्धतीने शेवट दिल्यासारखा वाटतो…(Karishma Kapoor and Akshaye Khanna affair)
================================
हे देखील वाचा : Akshaye Khannaच्या मागे वेडी होती करिना कपूर; स्वत:चं दिली होती कबूली…
================================
विशेष म्हणजे दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरु असूनही दोघांनी आजवर स्क्रिन शेअर केली नाही आहे… तर दुसरीकडे करिश्माची बहिण करिना (Kareena Kapoor) हिने बऱ्याच चित्रपटांमध्ये अक्षयसोबत काम केलं आहे… इतकंच नाही तर अक्षय खन्ना तिचा क्रश असल्याची कबूलीही तिने एका व्हिडिओत दिली होती… अक्षय खन्ना याच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर नुकताच तो ‘धुरंधर’ (Dhurandhar) चित्रपटात झळकला होता.. आणि येत्या काळात ‘महाकाली’ चित्रपटात तो शुक्राचार्यांच्या भूमिकेत दिसणार आहे… (Bollywood News)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi