Super Duper Movie Poster ने वाढवली उत्सुकता; उन्हाळ्यात अनुभवता येणार

Pinga g pori pinga: पिंगा गं पोरी पिंगा मालिकेत नवा ट्विस्ट; उलघडणार मीनाक्षीच्या अपहरणाचं गुपित
मराठी छोट्या पडद्यावर सध्या एक मोठं रहस्य आणि ते म्हणजे लोकप्रिय सीरियल ‘पिंगा गं पोरी पिंगा’ (Pinga G Pori Pinga) मध्ये सुरू असलेली रहस्यकथा. बुलबुल बागेतील वातावरण अधिकच नाट्यमय बनत चाललं आहे, कारण वल्लरीची प्रिय मित्र मीनाक्षी अचानक बेपत्ता झाली आहे. पण या अचानक गायब होण्यामागे काही मोठं गुपित आहे का? या प्रश्नाचे उत्तर आता सोडवण्यात येणार आहे. मीनाक्षी, जी बेळगावहून मुंबईत आलेली होती, अचानक गायब झाल्यामुळे तिच्या परिवारात आणि बुलबुल बागेतील लोकांत एकच खळबळ उडाली आहे. परीक्षा देण्यासाठी आलेली ही निरागस मुलगी, कुठे गायब झाली? याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न वल्लरी आणि तिच्या पिंगा गर्ल्स करत आहेत. हा शोध काही साधा नसून, त्यात असलेला एक रहस्याचा घटक आहे. (Pinga G Pori Pinga Serial)

मीनाक्षीच्या गायब होण्याच्या गोष्ट समजताच त्वरित वल्लरीने आपल्या पिंगा गर्ल्सला एकत्र करून शोध मोहिमेची सुरुवात करते . सर्व मुली, थोड्या भीतीत आणि खूपच कुतूहल असतानाही, एकजूट होऊन मीनाक्षीच्या शोधात उतरल्या आहेत. त्यांची मोहिम एकाच उद्देशाने सुरू झाली आहे. मीनाक्षीला परत घरी आणणे. पण शोधात ते खूप खोलात जात आहेत, आणि त्यांना काही अशा धक्कादायक गाठी लागतात ज्यामुळे ते आणखी साशंक होतात.

शोधाच्या दरम्यान, बुलबुल बागेत नवीन दाखल झालेली मंजुषा हिने आपली ओळख एका प्रतिष्ठित आश्रमाशी जोडली आहे. तिच्या गुप्त वागणुकीने आणि नवीन हालचालींनी पिंगा गर्ल्समध्ये एक नवा संशय निर्माण केला आहे. तिचा आणि मीनाक्षीच्या गायब होण्याचा संबंध आहे का? तसेच, आता त्या रहस्याची दिशा इशारा करते की, मीनाक्षीला कोणीतरी पळवले असावे. शोधाची मोहिम जसजशी पुढे सरकते, तसतसे ते गडद आणि धक्कादायक बनत जात आहे. मीनाक्षीच्या गायब होण्यामागे आता एका मोठ्या रॅकेटचा हात असल्याची चर्चा रंगू लागली आहे. वल्लरी आणि तिच्या पिंगा गर्ल्स एकत्र येऊन या गुपिताच्या उकलासाठी संघर्ष करत आहेत. काही तपशील, साक्षी आणि पुरावे त्यांना अशी दिशा दाखवत आहेत की हे सर्व एका मोठ्या षडयंत्राचा भाग असू शकतात.(Pinga G Pori Pinga Serial)
=============================
हे देखील वाचा: आजारपणातून बरी होताच Jahnavi Killekar थेट पोहोचली थायलंडला; शेयर केले ग्लॅमरस फोटो…
=============================
मीनाक्षीच्या गायब होण्याची गुंतागुंत उलगडण्याची वेळ येईल 14 डिसेंबरला, जेव्हा ‘पिंगा’ मालिकेचा महारविवार विशेष भाग प्रसारित होईल. या भागात मीनाक्षीच्या गायब होण्याची गुढ उलगडणार आहे, आणि कोणत्या रहस्याचा पर्दा उचलला जाणार आहे, हेच सर्व प्रेक्षकांनाही आता पाहायला मिळणार आहे.