
Border 2 चित्रपटाचा टीझर ‘या’ दिवशी होणार रिलीज!
बॉक्स ऑफिस आणि थिएटर्समध्ये ‘धुरंधर’ने (Dhurandhar) धुरळा केला आहे… ८ दिवसांत २६० कोटींचा गल्ला बॉक्स ऑफिसवर कमवत रणवीर सिंगच्या या चित्रपटाने एक नवा रेकॉर्ड केला आहे… आता ‘धुरंधर’ला लवकरच टक्क देण्यासाठी सनी देओलचा आगामी ‘बॉर्डर २’ (Border 2) चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे…. १९९७ मध्ये रिलीज झालेल्या बॉर्डर चित्रपटाला हा सीक्वेल असून प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागली आहे…
दरम्यान, ‘बॉर्डर २’ चित्रपटात सनी देओल (Sunny Deol), वरुण धवन, अहान शेट्टी, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी अशी स्टारकास्ट असून या चित्रपटाचा टीझर १६ डिसेंबर २०२५ रोजी रिलीज होणार आहे… ‘बॉर्डर २’च्या टीझरबाबत अपडेट देणारी पोस्ट करत लिहिलं आहे की, “विजयी दिवसाचा जल्लोष, १९७१ चा विजय आणि वर्षातील सगळ्यात मोठा टीझर लॉन्च – एक साथ! १६ डिसेंबरला दुपारी १.३० वाजता”… (Entertainment News)

देशभक्तीवर आधारित अनेक चित्रपट आजवर आले. यात ‘बॉर्डर’ (Border) हा चित्रपट अग्रस्थानी नक्कीच आहे. १९९७ साली आलेल्या ‘बॉर्डर’ चित्रपटात हिंदी चित्रपटसृष्टीतील एकाहून एक दिग्गज कलाकार होते. सनी देओल, अक्षय खन्ना, सुनील शेट्टी व जॅकी श्रॉफसह अनेक कलाकार दिसले होते. जितका हा चत्रपट गाजला तितकीच चित्रपटातील गाणीही लोकप्रिय झाली होती. १९७१ साली भारत-पाकिस्तानमध्ये (Bharat-Oakistan War) झालेल्या युद्धावर चित्रपटाचं कथानक आधारित होतं… (Bollywood news)
================================
हे देखील वाचा : करिश्मा कपूरच्या प्रेमात एकेकाळी वेडा होता Akshaye Khanna?
================================
दरम्यान, ‘बॉर्डर’चं दिग्दर्शन जे.पी.दत्ता यांनी केलं होतं आणि या चित्रपटाने तेव्हा ३९ कोटींची कमाई केली होती आणि जगभरात ६६ कोटींचा पल्ला पार केला होता… तर,अनुराग सिंग दिग्दर्शित ‘बॉर्डर २’ चित्रपटात वरुण धवनसोबत सनी देओल, दिलजीत दोसांझ, अहान शेट्टी, सोनम बाजवा, मोना सिंग, मेधा राना यांच्या मुख्य भूमिका दिसणार असून २३ जानेवारी २०२६ रोजी ‘बॉर्डर २’ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi