लक्ष्मीकांत बेर्डेंनी Jeetendra यांच्यामुळे खाल्लेला वडिलांचा मार!

….म्हणून Laxmikant Berde यांनी पिळगांवकरांचा ‘नवरा माझा नवसाचा’ रिजेक्ट केला!
मराठीतलं लोकप्रिय त्रिकूट म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde), अशोक सराफ आणि सचिन पिळगांवकर… ‘अशी ही बनवाबनवी’, ‘एका पेक्षा एक’, ‘भूताचा भाऊ’ असे बरेच सुपरहिट चित्रपट या मातब्बर कलाकारांनी दिले आहेत… पण तुम्हाला माहित आहे का.. १९९१ मध्ये आलेल्या ‘आयत्या घरात घरोबा’ चित्रपटात या तिघांनी एकत्र शेवटचं काम केलं होतं.. खरं तर, २००५ मध्ये रिलीज झालेल्या ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटात हे त्रिकूट पुन्हा दिसणार होतं पण चक्क लक्ष्या मामांनीच या चित्रपटाला नकार दिला होता. काय होता किस्सा जाणून घेऊयात…

‘नवरा माझा नवसाचा’ हा सचिन पिळगांवकरांचा (Sachin Pilgoankar) आणखी एक आयकॉनिक मुव्ही. या चित्रपटात सचिन पिळगांवकर, अशोक सराफ तर होतेच पण ज्या भूमिकेत सुनील तावडे दिसले होते ती भूमिका लक्ष्या मामांनी करावी अशी इच्छा त्यावेळी प्रेक्षकांनी व्यक्त केली होती. पण तुम्हाला माहित आहे का? सचिन यांनी हा चित्रपट आधीच लक्ष्मीकांत यांना ऑफर केला होता.. याबद्दल एका इंटरव्ह्युमध्ये बोलताना पिळगांवकर म्हणालेले की, “मी लक्ष्याला खुप मिस करतो. ‘नवरा माझा नवसाचा;’ चित्रपट २००५ मध्ये रिलीज झाला पण तो २००४ मध्येच रेडी होता. त्या चित्रपटात लक्ष्याला मला घ्यायचं होतंच आणि आमच्यात तसं बोलणंही झालं होतं, पण लक्ष्यानेच मला या चित्रपटात काम करायला नकार दिला होता. तो मला म्हणाला होता की, तु मला विचारतोयस यातच मला आनंद आहे, पण डॉक्टर काम करायला परवानगी देत नाहीयेत…” आणि त्यानंतरच १६ डिसेंबर २००४ ला लक्ष्मीकांत बेर्डेंनी जगाचा निरोप घेतला आणि ‘नवरा माझा नवसाचा;’ चित्रपट एप्रिल २००५ मध्ये रिलीज झाला. (Navara Maza Navasacha Movie)

जर का लक्ष्मा मामांची तब्येत ठणठणीत असती तर या चित्रपटात लालू-प्रसादची जोडी लक्ष्मा मामा आणि अशोक मामांनी गाजवली असती आणि पुन्हा एकदा दोघांच्या विनोदाचं अचुक टायमिंग प्रेक्षकांना अनुभवता आलं असतं. लक्ष्मीकांत बेर्डेंनी या चित्रपटात आपल्या उत्कृष्ट अभिनयाने चार चांद लावले असते यात तिळमात्र शंका नाही… पण दुर्देवाने १९९१ नंतर मराठी प्रेक्षकांना अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन पिळगांवकर यांना एकत्र पाहता आलंच नाही. एखादा कॉमेडी चित्रपट आज मराठी किंवा हिंदीत येतो, पण ८०-९०च्या दशकात कॉमेडी मराठी चित्रपटांची रांग लावत ते हाऊसफुल्ल करण्याची ताकद या तिन्ही कलाकारांमध्ये होती. (Marathi Movies)
================================
================================
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर, ‘लेक चालली सासरला’, ‘झपाटलेला’, ‘दे दणादण’, ‘जीवा सखा’, ‘बाळाचे बाप ब्रम्हचारी’, ‘हमाल दे धमाल’, ‘धडाकेबाज’, ‘फेका फेकी’, ‘मैने प्यार किया’, ‘साजन’, ‘दिल की बाजी’, ‘माझा छकुला’, ‘छुपा रुस्तम’, ‘हम तुम्हारे है सनम’, ‘आई पाहिजे’ अशा अनेक मराठी-हिंदी चित्रपटांत त्यांनी कामं केली आहेत. (Laxmikant Berde Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi