Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Raj Kapoor : आर के फिल्म्सचे एक्स्ट्रा फुटेज डिलिटेड शॉट्स

राहिल्या त्या आठवणी! Ajit Pawar आणि नाना पाटेकर यांचे आजवर

जेव्हा Gulzar यांची एक गझल चार संगीतकारांनी स्वरबद्ध केली!

Dhurandharने रचला नवा रेकॉर्ड; जगभरात ५६ दिवस प्रेक्षकांचं केलं मनोरंजन

Mayasabha : ‘तुंबाड’ विसरा… हा सिनेमा मेंदू सुन्न करेल!

थांबणं Arijit Singh याचं….

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाने जाहिर केली नवी रिलीज डेट!

रस्त्यात अडवून संगीतकार Sachin Dev Burman यांना कुणी आणि का

Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा जुंपणार; डॉन आणि सागरमध्ये होणार

Anil Kapoor :  १५ दिवसांमध्ये स्क्रिप्ट लिहिली आणि ३७ वर्षांपूर्वी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Bigg Boss Marathi 6 शी अंकिता वालावलकरचं आहे खास कनेक्शन; व्हिडिओ शेअर स्वतः करत दिली माहिती 

 Bigg Boss Marathi 6 शी अंकिता वालावलकरचं आहे खास कनेक्शन; व्हिडिओ शेअर स्वतः करत दिली माहिती 
Bigg Boss Marathi 6 Promo
टीव्ही वाले मिक्स मसाला

Bigg Boss Marathi 6 शी अंकिता वालावलकरचं आहे खास कनेक्शन; व्हिडिओ शेअर स्वतः करत दिली माहिती 

by Team KalakrutiMedia 16/12/2025

टीव्हीवरील सर्वात चर्चित रिअॅलिटी शो पैकी एक असलेला ‘Bigg Boss Marathi ’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. हिंदी बिग बॉसचा 19 वा सीझन नुकताच संपला असून, त्यानंतर लगेचच मराठी बिग बॉसच्या नव्या पर्वाची चाहूल लागली. यावेळीही प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेता रितेश देशमुखकडेच सूत्रसंचालनाची धुरा असणार आहे. कलर्स मराठी वाहिनीने नुकताच ‘बिग बॉस मराठी 6’ चा पहिला प्रोमो प्रदर्शित केला आणि सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं. या प्रोमोमधून शो अधिक रंगतदार आणि वेगळ्या अंदाजात सादर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे, हा बहुचर्चित सीझन 11 जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.(Bigg Boss Marathi 6)

Bigg Boss Marathi 6
Bigg Boss Marathi 6 Promo

दरम्यान, प्रोमो समोर आल्यानंतर एका जुन्या स्पर्धकाच्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून ओळख मिळवलेल्या अंकिता प्रभू वालावलकर हिने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे चर्चेला नवा विषय मिळाला आहे. अंकिताने तिचा पती कुणाल भगत आणि बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाचा काहीतरी खास संबंध असल्याचं सूचक विधान केलं. यामुळे चाहत्यांमध्ये “कुणाल भगत बिग बॉसच्या घरात जाणार का?” अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Bigg Boss Marathi 6
Bigg Boss Marathi 6 Promo

‘बिग बॉस मराठी 6’ च्या प्रोमोशी अंकिता प्रभू वालावलकरच्या नवऱ्याचा खास संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत अंकितानं स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत खुलासा केला आहे. अंकितानं सांगितलं की, तिचा नवरा कुणाल भगत यानं ‘बिग बॉस मराठी 6’ च्या प्रोमोचं संगीत तयार केलं आहे. इतकंच नाही तर हा प्रोमो कुणालच्या मड आय स्टुडिओमध्येच एडिट करण्यात आला आहे. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये प्रोमो एडिटिंगदरम्यानचे क्षणही पाहायला मिळतात. याआधी ‘बिग बॉस मराठी 5’ च्या प्रोमोचं म्युझिकसुद्धा कुणालनंच केलं होतं, अशी माहिती अंकितानं दिली.“हे काम पाहताना आमचा सीझन आठवला,” असं ही ती म्हणाली. (Bigg Boss Marathi 6)

================================

हे देखील वाचा: Ranpati Shivray: Swari Agra Teaser: शौर्य, बुद्धी आणि धाडसाचा अद्वितीय संगम; पडद्यावर उलगडणार शिवइतिहासातील थरारक अध्याय !

================================

याआधीचा म्हणजेच पाचवा सीझन प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला होता. विजेता सूरज चव्हाणसह  इतर अनेक स्पर्धकांनीही आपली वेगळी छाप पाडली होती. त्यामुळे सहाव्या पर्वाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा अधिकच वाढल्या आहेत.हिंदी बिग बॉसच्या मंचावर स्वतः रितेश देशमुखने जाऊन मराठी बिग बॉसची घोषणा केल्यानंतर या शोविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता नव्या स्पर्धकांची यादी, घरातील थीम आणि होणारे ट्विस्ट्स यांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.एकंदरीत, ‘बिग बॉस मराठी 6’ हा सीझन मनोरंजन, ड्रामा आणि अनपेक्षित घडामोडींनी भरलेला असणार, यात शंका नाही.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: ankita walavarkar ankita walawalkar husband Bigg Boss Hindi Bigg Boss Marathi bigg boss marathi 16 Celebrity Colors Marathi Entertainment Kunal Bhagat Ritesh deshmukh salman khan
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.