
“views करता देशासाठी आयुष्य पणाला लावणाऱ्यांची थट्टा करणं हा IQ नाही”, ‘धुरंधर’च्या व्हायरल ट्रेण्डवर Ankita Walawalkar संतापली
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ (Dhurandhar) चित्रपटाची सध्या सगळीकडेच तुफान चर्चा आहे… पाकिस्तानातील भारतीय स्पायची कथा या चित्रपटात दाखवली असून काही सत्य घटनांवर आधारित प्रसंगावरुन चित्रपटाचं कथानक साकारण्यात आलं आहे… चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु आहेच, शिवाय अक्षय खन्नाचा यातील डान्स आणि त्यावर तयार झालेले रिल्स विशेष लक्षवेधी ठरत आहेत… या पाठोपाठ आणखी एक ट्रेण्ड सध्या गाजतोय तो म्हणजे Day 1 in pakistan s indian spy… या ट्रेण्डवर लाखो लोकांनी रिल्स बनवले असून त्यांना आता कोकण हार्टेडगर्ल अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) हिने चांगलंच झापलं आहे…. रिअल स्पाय बनणं किती कठिण आहे असं म्हणत तिने सोशल मिडिया क्रिएटर्स आणि लोकांची कानउघाडणीच केली आहे… नेमकं ती काय म्हणाली आहे जाणून घेऊयात… (Bollywood News)
सोशल मिडियावर अंकिताने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तिने म्हटलं आहे की,Spy वर मस्करी करून reel बनवणं म्हणजे विनोद नाही तर अज्ञान आहे. त्यांचं आयुष्य कंटेंट नाही, तो दररोजचा धोका आहे. थोड्या views साठी देशासाठी आयुष्य पणाला लावणाऱ्यांची थट्टा करणं हा IQ नाही, हे संवेदनशून्यपणाचं प्रदर्शन आहे. Spy बनायला फक्त attitude नाही तर…मेंदू,धैर्य आणि त्याग लागतो. तुमच्या reels मुळे चित्रपट promote होतील, पण त्यामागे असलेली देशसेवा, देशासाठी जगणाऱ्यांची किंमत कमी होतेय हे लक्षात ठेवा. एकदा स्वतःला त्यांच्या जागी ठेवून बघा. नाव विसरावं लागतं, कुटुंब विसरावं लागतं, आणि तरीही देश पहिला. Views मिळतील तुम्हाला पण लाज उरायला हवी”.. (Entertainment News)

अंकिता पुढे म्हणाली आहे की, ‘Day 1 As Spy In Pakistan कसला भन्नाट ट्रेंड चालू झालाय ना हा. म्हणजे सगळे क्रिएटर ह्यावर रील्स बनवतायत. एवढं सोपं वाटतंय का? स्पायचं काम? त्यावर आपण रील्स बनवू शकतो आणि जोक पास करू शकतो. स्पाय बनणं तुम्हाला वाटतं तितकं सोपं नाहीये. एका वेगळ्या देशात, वेगळ्या ओळखीने ते राहत असतात. तिथून ते देशसेवाच करत असतात. सतत त्या तणावाखाली असताना आपली देशसेवा करणं सोपं नाहीये. कुटुंबापासून लांब राहून, आपला जीव एखाद्या चुकीमुळे जाऊ शकतो. थोडक्यात सांगायचं तर, जशी आर्मी आपल्याला प्रिय आहे, तसे हे स्पायसुद्धा देशसेवा करत असतात”… (Dhurandhar Movie News)

पुढे तिने असं देखील म्हटलं आहे की, ‘आता जेवढे क्रिएटर ह्यावर रील बनवतायत ते २६ जानेवारी, १५ ऑगस्टलाही देशसेवेवर रील्स बनवतील. पण, तुम्हाला ह्या गोष्टीची जाणीव असली पाहिजे की, ते लोक काय करतायत. थोडंसं वाचन करा. आताचं जग हे फेम आणि क्रेडिटवर चालतं. पण, हे स्पाय आहेत त्यांना फेम आणि क्रेडिट मिळत नाही. त्यांचं नाव कुठे येत नाही. या सगळ्याचा विचार करा. आलाय आपला ट्रेंड म्हणून बनवायच्या रील हे थांबवा. एकदा स्वतःला त्यांच्या जागी ठेवून बघा. नाव विसरावं लागतं, कुटुंब विसरावं लागतं, आणि तरीही देश पहिला. Views मिळतील तुम्हाला पण लाज उरायला हवी‘ असं म्हणत अंकिताने लोकांना आवाहन केलं आहे.. आता तिच्या या आवाहनाचा काही उपयोग होणार की नाही हे पाहावं लागेल…
दरम्यान, ‘धुरंधर’ने बॉक्स ऑफिसवर धुरळा केला आहे… दुसऱ्या आठवड्यात सलग ४ दिवसांमध्ये १६० कोटींचा पल्ला धुरंधरने पार केला असून केवळ २ आठवड्यातच या चित्रपटाने ४५० कोटींचा टप्पा पार केला आहे… त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये विकी कौशलच्या छावा चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचा धुरंधऱ रेकॉर्ड मोडणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे…
================================
================================
‘धुरंधर’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर नजर टाकूयात… सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार ‘धुरंधर’ने पहिल्या दिवशी २८ कोटी, दुसऱ्या दिवशी ३२ कोटी, तिसऱ्या दिवशी ४३ कोटी,चौथ्या दिवशी २३.३५ कोटी, पाचव्या दिवशी २७ कोटी,सहाव्या दिवशी २७ कोटी, सातव्या दिवशी २७ कोटी कमवत पहिल्या आठवड्याच्या शेवटी २०७.२५ कोटींची कमाई केली होती… ‘धुरंधर’ने दुसऱ्या आठवड्याचीही थिएटरमध्ये दमदार सुरुवात करत सलग ४ दिवसांमध्ये १५० कोटींचा टप्पा पार केला आहे. दुसऱ्या आठवड्याची आकडेवारी पाहता आठव्या दिवशी ३४.७० कोटी,नवव्या दिवशी ५३.७० कोटी, दहाव्या दिवशी ५८.२० कोटी,अकराव्या दिवशी ३१.८० कोटी, बाराव्या दिवशी ३२.१० कोटी कमावत एकूण ४२८.५० कोटींची कमाई केली आहे. महत्वाचं म्हणजे धुरंधर चित्रपटाने रणवीर सिंगच्या स्वत:च्याच ‘पद्मावत’ (Padmaavaat) चित्रपटाचा रेकॉर्ड मोडून काढला आहे… २०१८ मध्ये रिलीज झालेल्या ‘पद्मावत’ने ३०२.१५ कोटींचं लाईफटाईम कलेक्शन केलं आहे… (Dhurandhar Box Office Collection)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi