Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Raj Kapoor : आर के फिल्म्सचे एक्स्ट्रा फुटेज डिलिटेड शॉट्स

राहिल्या त्या आठवणी! Ajit Pawar आणि नाना पाटेकर यांचे आजवर

जेव्हा Gulzar यांची एक गझल चार संगीतकारांनी स्वरबद्ध केली!

Dhurandharने रचला नवा रेकॉर्ड; जगभरात ५६ दिवस प्रेक्षकांचं केलं मनोरंजन

Mayasabha : ‘तुंबाड’ विसरा… हा सिनेमा मेंदू सुन्न करेल!

थांबणं Arijit Singh याचं….

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाने जाहिर केली नवी रिलीज डेट!

रस्त्यात अडवून संगीतकार Sachin Dev Burman यांना कुणी आणि का

Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा जुंपणार; डॉन आणि सागरमध्ये होणार

Anil Kapoor :  १५ दिवसांमध्ये स्क्रिप्ट लिहिली आणि ३७ वर्षांपूर्वी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

अखेर त्या दोघांची घरवापसी झालीच! Nilesh Sable आणि भाऊ कदम झी मराठीवर परतले

 अखेर त्या दोघांची घरवापसी झालीच! Nilesh Sable आणि भाऊ कदम झी मराठीवर परतले
टीव्ही वाले मिक्स मसाला

अखेर त्या दोघांची घरवापसी झालीच! Nilesh Sable आणि भाऊ कदम झी मराठीवर परतले

by रसिका शिंदे-पॉल 17/12/2025

२०२५ या वर्षात बऱ्याच जुण्या जाणत्या कलाकारांनी इंडस्ट्रीत कमबॅक केलं आहे… अशातच मराठीतील २ विनोदवीर फायनली छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा एकत्र परतणार आहेत… सलग १० वर्ष आपल्या भन्नाट कॉमेडीने लोकांचं मनोरंजन करणाऱ्या या दोघांचा ‘आता कमबॅक होणार’ असं म्हणत पुनरागमनाचा व्हिडिओ झी मराठी वाहिनीच्या सोशल मिडियावर शेअर करण्यात आला होता.. आणि आता याचं उत्तर आपल्याला मिळालं असून ते २ कलाकार दुसरे तिसरे कोणी नसून भाऊ कदम आणि डॉ. निलेश साबळे आहेत.

गेल्या २ वर्षांपासून निलेश साबळे छोट्या पडद्यापासून लांब होता… इतकंच नाही तर निलेश साबळे आणि भाऊ कदम यांच्यात वाद विवाद झाल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या… अशातच निलेशनं झी मराठीवरून दुसऱ्या वाहिनीवर उडी घेतल्यानंतर वाहिनीशीही काही मतभेद झाल्याचं म्हटलं गेलं होतं आणि त्यामुळे पुन्हा निलेश झी मराठीवर येणार नसल्याचंही काही जणांनी म्हटलं होतं… (Nilesh Sabale & Bhau Kadam)

मात्र, या सगळ्या अफवांना मोडून काढत डॉ. निलेश साबळे आणि भाऊ कदम हे दोन विनोदवीर पुन्हा एकदा एकत्र एका कार्यक्रमात दिसणार आहेत. दोघांचा एक नवीन प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आलाय. प्रेक्षक पण करत आहेत wait..कधी होणार या दोघांची भेट? असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलं आहे… प्रोमोत निलेश साबळेच्या हातात आरतीचं ताट असून, तो देव-देवतांच्या मूर्तीसमोर पूजा करताना दिसतोय. तर दुसरीकडे भाऊ कदम निलेशच्या घराकडे येण्यासाठी आतुर झालेला दिसतोय. या व्हिडिओच्या बॅकराऊंडला कभी खुशी कभी गममधील संगीत वाजताना दिसतंय. मजेशीर अशा या प्रोमोनं प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे.

================================

हे देखील वाचा : “कर लो ना थोडी मेहनत”; ८ तासांच्या शिफ्टसाठी दीपिकाचा हटट् पण Ranveer Singh चं ‘ते’ विधान व्हायरल

================================

दरम्यान, ‘ उगाच अॅवॉर्ड्स’ या झी मराठीवरील आगामी सोहळ्याचं ते सूत्रसंचालन करणार असल्याचं सांगितलं जात आहे… यात सर्वोत्कृष्ट रडूबाई, सर्वोत्कृष्ट लोटपोट सीन, सर्वोत्कृष्ट कानाखाली जाळ, सर्वोत्कृष्ट चाबूक डायलॉग, सर्वोत्कृष्ट ढिशूमढिशूम, सर्वोत्कृष्ट इलुइलू असे अनेक गमतीशीर पुरस्कार या सोहळ्यात दिले जाणार असल्याचंही म्हटलं जातंय… आता नेमका तो कार्यक्रम कोणता असेल याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे…

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: bhau kadam Bollywood Entertainment News Marathi Serial nilesh sabale zee marathi
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.