Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6: चहावरून घरातलं वातावरण तापणार; अनुश्री आणि

“The Kerala Story 2 एक प्रोपोगंडा चित्रपटआ आहे”; अनुराग कश्यपने

Bigg Boss Marathi 6 : सदस्यांच्या डोळ्यात धूळ फेकत प्रभूने

Tanya Mittal लवकरच अडकणार लग्नबंधनात? ब्राइडल लेहंग्यातील व्हिडिओमुळे चर्चांना उधाण…

Aetashaa Sansgiri Wedding: ‘दख्खनचा राजा’ने जुळवलेली जोडी अडकली लग्नबंधनात; एतशा-निषाद

‘खूबसूरत’; अभिनेत्री Rekha हिला पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळवून देणारा चित्रपट

लक्ष्मीकांत बेर्डेंनी Jeetendra यांच्यामुळे खाल्लेला वडिलांचा मार!

Anandi New Serial: जिद्द आणि सकारात्मकतेने आयुष्याचा सामना करणारी ‘आनंदी’

Bigg Boss Marathi 6: सहाव्या आठवड्यानंतर घराबाहेर पडताच Sachin Kumavat

VIROSH चं लग्न! विजय देवरकोंडा आणि रश्मिकाने अखेर आपल्या नात्याची

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

 Subhedar Guest House: विजय केंकरे दिग्दर्शित ‘सुभेदार गेस्ट हाऊस’ २५ डिसेंबरपासून रंगभूमीवर

  Subhedar Guest House: विजय केंकरे दिग्दर्शित ‘सुभेदार गेस्ट हाऊस’ २५ डिसेंबरपासून रंगभूमीवर
Subhedar Guest House Marati Natak
नाट्यकला मिक्स मसाला

 Subhedar Guest House: विजय केंकरे दिग्दर्शित ‘सुभेदार गेस्ट हाऊस’ २५ डिसेंबरपासून रंगभूमीवर

by Team KalakrutiMedia 19/12/2025

मराठी रंगभूमीवर दर्जेदार नाट्यकृती सादर करण्याची परंपरा जपणारी ‘दि गोवा हिंदु असोसिएशन’ पुन्हा एकदा नाट्यप्रेमींसाठी नवे पर्व घेऊन येत आहे. काही काळाच्या विश्रांतीनंतर ही प्रतिष्ठित संस्था नव्या जोमाने रंगभूमीवर सक्रिय होत असून, त्यांच्या आगामी नाटकाचे नाव आहे ‘सुभेदार गेस्ट हाऊस’ (Subhedar Guest House). दि गोवा हिंदु असोसिएशन आणि सुकल्प चित्र यांच्या संयुक्त प्रयत्नांतून साकारलेले हे नाटक येत्या २५ डिसेंबरपासून रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नाटकाची निर्मिती दि गोवा हिंदु असोसिएशन, कल्पक सदानंद जोशी आणि अमरजा गोडबोले यांनी केली आहे.(Subhedar Guest House Play)

Subhedar Guest House Play
Subhedar Guest House Marathi Natak

या नाटकाचा पहिला प्रयोग पुण्यात २५ डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे होणार असून, त्यानंतर मुंबईतील पहिला प्रयोग २६ डिसेंबर रोजी शिवाजी मंदिर येथे सादर केला जाणार आहे. ‘सुभेदार गेस्ट हाऊस’ या नाटकाची कथा शिरीष देखणे यांनी लिहिली असून, दिग्दर्शनाची जबाबदारी ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे (Vijay Kenkare) यांनी सांभाळली आहे. अभिनयाच्या आघाडीवर सौरभ गोखले, शंतनू मोघे, आनंद म्हसकर, मृण्मयी गोंधळेकर, विनिता दाते, सना कुलकर्णी, रोहित देशमुख आणि आनंद पाटील यांसारखे कसदार कलाकार या नाटकात झळकणार आहेत.

Subhedar Guest House Play
Subhedar Guest House Marathi Natak

नाटकाची तांत्रिक बाजूही तितकीच भक्कम आहे. नेपथ्याची रचना प्रदीप मुळ्ये यांनी केली असून, संगीत अजित परब यांचे आहे. गीतलेखन वैभव जोशी यांचे असून, प्रकाशयोजना शीतल तळपदे, रंगभूषा शरद विचारे आणि वेशभूषा मंगल केंकरे यांनी साकारली आहे. सूत्रधार म्हणून श्रीकांत तटकरे आणि राजेंद्र पै यांची भूमिका महत्त्वाची आहे. (Subhedar Guest House Play)

================================

हे देखील वाचा: Me Sansar Maza Rekhite Serial: नव्या मालिकेवर प्रेक्षक नाराज ; प्रोमो पाहताच व्यक्त केला राग

================================

दि गोवा हिंदु असोसिएशन पुन्हा रंगभूमीवर कार्यरत होत असल्याची बातमी समजताच नाट्यरसिकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दमदार कथा, अनुभवी दिग्दर्शन आणि मजबूत तांत्रिक टीम यांच्या जोरावर ‘सुभेदार गेस्ट हाऊस’ हे नाटक मराठी रंगभूमीवर आपली खास छाप पाडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Anand Mhaskar Celebrity Entertainment Marathi Natak Mrunmayi Gondhalekar saurabh gokhale shantanu moghe Subhedar Guest House Subhedar Guest House natak vijay kenkare
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.