
आखरी हिस्सा बाकी है! अजय देवगणच्या Drishyam 3ची रिलीज डेट जाहिर; पणजी ट्रीपच्याच तारखेला….
IG मीरा देशमुखचा मुलगा सॅम याच्यासोबत काय झालं होतं? याचं उत्तर तर ‘दृश्यम’ आणि ‘दृश्यम २’ (Drishyam Movie series) मध्ये मिळालंच… पण आता या क्राईम थ्रिलरचा शेवटचा भाग आथा लवकरच प्रेक्षकांच्या समोर येणार आहे… बऱ्याच दिवसांपासून ज्या चित्रपटाची चर्चा होती तो अजय देवगणचा (Ajay Devgan) ‘दृश्यम ३’ चित्रपट २०२६ मध्ये रिलीज होणार असून नुकतीच चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली… रिलीज झालेल्या या व्हिडिओमध्ये अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या भूमिकेत दिसतोय… (Drishyam 3 announcement)

सोशल मिडियावर ‘दृश्यम ३’ चित्रपटाची अनाऊन्समेंट करत आखरी हिस्सा बाकी है असं विजय साळगावकर बोलताना दिसत आहे… विजयसाठी त्याचं कुटुंब किती महत्वाचं आहे आणि घडलेल्या घटनेचा शेवट नेमकी काय होता हे आता फायनली तिसऱ्या भागात समोर येणार आहे… सॅमच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर विजय या सगळ्या घटनेवर पुस्तक छापतो आणि एक मुव्ही तयार करायचा विचार करतो… ‘दृश्यम २’ मध्ये तर पुस्तकामुळे त्याची सुटका होते पण मुव्हीचा शेवट ऐन वेळी विजयने बदलेला असतो असं अभिनेते सौरभ शुक्ला नवे आयजी तरुण अहलावत (अक्षय खन्ना (Akshaye Khanna) आणि मीरा देशमुख (तब्बू (Tabu)) यांना सांगतात… आता नेमका ट्वीस्ट काय असणार याचं २ ऑक्टोबर २०२६ ला मिळणार आहे…

दरम्यान, ‘दृश्यम’ चित्रपटाने बॉलिवूडमध्ये ‘फॅमिली थ्रिलर’ हा एक नवा जॉनर प्रेक्षकांसमोर आणला आणि विशेष म्हणजे प्रेक्षकांना तो आवडलाही… जितका हा चित्रपट लोकप्रिय झाला तितकंच विजय साळगावकर हे पात्र आयकॉनिक झालं… आपल्या कुटुंबासाठी वडिल कोणत्या थराला जाऊन प्रोटेक्ट करु शकतात याचं उदाहरण म्हणजे विजय साळगावकर… खरंतर, दरवर्षी २ ऑक्टोबरला सोशल मीडियावर ‘दृश्यम’मधील सत्संग, पावभाजी आणि एकूणच साळगावकर कुटुंबाच्या पणजी ट्रीपचे मीम्स व्हायरल होत असतात… पण आता २०२६ मध्ये २ ऑक्टोबर हाच दिवस अधिक खास ठरणार आहे… तसेच, दोन्ही भागांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर दृश्यमने ११० कोटी आणि दृश्यम २ ने ३३० कोटींचा वर्ल्डवाईड गल्ला पार केला होता… आता दृश्यम ३ किती कमाई करणार आणि आखरी हिस्सा काय असणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे… (Drishyam 3 release date)
================================
हे देखील वाचा : Drishyam : मोहनलालच्या ‘दृश्यम ३’ चा फटका अजय देवगणच्या दृश्यमला लागणार?
================================
‘दृश्यम ३’ मधील कलाकारांबद्दल बोलायचं झालं तर, अजय देवगणसोबतच तब्बू, श्रिया सरन, रजत कपूर आणि इतर मूळ कलाकार या तिसऱ्या भागातही पाहायला मिळतील. याशिवाय दुसऱ्या भागात दिसलेला अक्षय खन्ना ‘दृश्यम ३’मध्ये दिसणार की नाही याचा उलगडा कदाचित लवकरच होईल. ‘स्टार स्टुडिओ १८’ प्रस्तुत आणि ‘पॅनोरमा स्टुडिओ’ची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेक पाठक करत असून कथेचं लिखाण अभिषेक पाठक, आमिल कियान खान आणि परवीज शेख यांनी केलंय. तसेच, दुसरीकडे मोहनलाल यांचा ओरिजनल मल्याळम दृश्यम ३ देखील लवकरच रिलीज होणार आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi