Sai Tamhankar : “अमराठी कलाकारांच्या ग्लॅमरच्या नादात आपण आपल्याच मातीतील

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’नंतर Ranveer Singh-Alia Bhatt पुन्हा एकत्र झळकणार?
अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) नुकत्याच आपल्या नव्या घरात रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि राहासोबत शिफ्ट झाली… यंदाचं वर्ष तिच्या पर्सनल लाईफमुळे खास चर्चेत राहिलं.. परंतु, तिचा या वर्षी एकही चित्रपट रिलीज झाला नाही.. २०२४ मध्ये तिचा ‘जिगरा’ (Jigara) चित्रपट आला होता खरा पण तो फारसा चालला नाही… त्यामुळे तिचा सुपरहिट चित्रपट २०२३ मधला ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) हाच ठरला… या चित्रपटात तिची णि रणवीर सिंगची जोडी गाजली… आता पुन्ह एकदा ही जोडी एकत्र भेटीला येणार असं समोर येतंय… (Ranveer Singh Movies)

२०२५ मध्ये ‘धुरंधर’ हा सुपरहिट चित्रपट रणवीर सिंगने (Ranveer Singh) आपल्या चाहत्यांना दिला… खरं तर २०२४ मध्ये रणवीर ‘सिंघम अगेन’ (Singham Again) चित्रपटात दिसला होता, पण यात तो प्रमुख भूमिकेत नव्हता… त्यामुळे २०२३ मधल्या ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ चित्रपटानंतर आता ५ डिसेंबर २०२५ रोजी रिलीज झालेल्या ‘धुरंधर’मध्ये तो २ वर्षांनी लीड हिरो म्हणून दिसला… जगभरात १००० कोटींचा गल्ला पार करणारा २०२५ मधला ६०० कोटी पार करत हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपटही ठरला.. आता सध्या रणवीर त्याच्या आगामी ‘प्रलय’ (Pralay Movie) चित्रपटाची तयार करतोय.. याच चित्रपटात त्याच्यासोबत आलिया झळकणार अशी माहिती समोर येत आहे… (Ranveer Singh Movies)

काही महिन्यांपूर्वीच ‘डॉन ३’ (Don 3), ‘प्रलय’ हे रणवीरचे आगामी चित्रपट असणार असल्याचं सांगण्यात आलं होतं… त्यापैकी प्रलयमध्ये त्याच्यासोबत कोणती अभिनेत्री झळकणार याबद्दलची माहिती समोर आलेली नव्हती. अशातच आता ‘प्रलय’ मध्ये रणवीर सिंहसह आलिया भट्ट झळकणार असल्याची चर्चा सुरू आहे. अर्थात याबद्दल अजून अधिकृत माहिती समोर आली नाही… (Bollywood News)
================================
हे देखील वाचा : पाकिस्तानात शूट झाला आहे का Ranveer Singh याचा ‘धुरंधर’?
================================
दरम्यान, रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांची जोडी ‘गली बॉय’ (Gully Boy) चित्रपटातही हिट ठरली होती.. तर, जय मेहता दिग्दर्शित ‘प्रलय’ (Pralay) हा झॉंबी थ्रिलर चित्रपट असणार आहे… त्यामुळे या चित्रपटात रणवीर सिंगसोबत अजून कोणते कलाकार दिसणार याची उस्तुकता लागली आहे.. तसेच, २०२५ मध्ये धुमाकूळ घालणाऱ्या ‘धुरंधर’ चित्रपटाचा सीक्वेल अर्थात ‘धुरंधर २’ प्रेक्षकांच्या भेटीला १९ मार्च २०२६ रोजी येणार आहे… त्यामुळे कदाचित २०२६ हे वर्ष देखील रणवीर सिंगचं असेल अशी शक्यता नाकारता येत नाही… (Dhurandhar 2)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi