“मला टोळी-काटा फरक पडत नाही, मी स्वत:साठी खेळणार”; Ruchita Jamdar

नवऱ्याच्या निधनाच्या ७ महिन्यानंतरच भाभीजी घर पर है फेम Shubhangi Atre करणार दूसर लग्न?
टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘भाभीजी घर पर है’ (Bhabi Ji Ghar Par Hai) मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शुभांगी अत्रे (Shubhangi Atre) तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत राहिली आहे. अभिनयात यशस्वी वाटचाल करत असतानाच तिच्या आयुष्यातील वैयक्तिक संघर्ष तिने शांतपणे पेलले. शुभांगीने 2003 साली पियुष पुरे यांच्यासोबत विवाह केला होता. पियुष डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत होता. विवाहानंतर दोघांना एक मुलगी झाली आणि सुरुवातीला सर्व काही सुरळीत असल्याचं चित्र होतं. मात्र कालांतराने या नात्यात तणाव वाढू लागला. 2022 ते 2023 या काळात त्यांच्या वैवाहिक आयुष्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या आणि अखेर फेब्रुवारी 2025 मध्ये दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. दुर्दैवाने, या निर्णयानंतर काही महिन्यांतच एप्रिल 2025 मध्ये शुभांगीच्या नवऱ्याच निधन झालं.(Actress Shubhangi Atre)

अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत शुभांगीने तिच्या आयुष्यातील कठीण टप्प्यांवर मनमोकळेपणाने भाष्य केलं होतं. घटस्फोटाचा निर्णय हा अत्यंत विचारपूर्वक घेतल्याचं तिने सांगितलं होतं. हा निर्णय केवळ स्वतःसाठी नव्हता, तर आपल्या मुलीच्या भविष्यासाठी असल्याचं तिने स्पष्ट केलं. मानसिक आरोग्यावर होत असलेला परिणाम लक्षात घेता स्वतःला त्या नात्यातून बाहेर काढणं गरजेचं होतं, असं तिचं मत होतं.

ती म्हणाली होती की, नात्यांमध्ये गुंतल्यावर त्याचा भावनिक परिणाम खोलवर होतो. एका टप्प्यावर चिंता, अस्वस्थता वाढू लागली होती. त्यामुळे काही काळ ती लोकांपासून दूर राहू लागली होती आणि स्वतःला कामात झोकून दिलं होतं. वैयक्तिक आयुष्यात कितीही वादळं आली तरी त्याचा परिणाम आपल्या कामावर होऊ दिला नाही, याचं समाधान तिला असल्याचंही तिने नमूद केलं होतं.(Actress Shubhangi Atre)
===============================
===============================
घटस्फोटाच्या काळात कुटुंबीय, मुलगी आणि जवळचे मित्र तिच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले, असंही तिने सांगितलं होतं. आयुष्यातील या अनुभवांनी तिला खूप काही शिकवलं आणि अधिक मजबूत बनवलं, असं तिचं मत होतं. याच वेळी दुसऱ्या लग्नाबाबत विचारलं आणि त्यावेळी शुभांगीने अतिशय स्पष्ट भूमिका मांडली होती. सध्या तरी पुन्हा लग्न करण्याचा कोणताही विचार नसल्याचं तिने सांगितलं. स्वतःवर कोणताही दबाव न घेता, आपलं संपूर्ण लक्ष मुलगी आशीच्या संगोपनावर केंद्रित असल्याचं ही ती म्हणाली होती.