‘खूबसूरत’; अभिनेत्री Rekha हिला पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळवून देणारा चित्रपट

“आम्ही आता म्हातारे झालोय…”; R Madhavn ३ इडियट्सच्या सीक्वेलबद्दल काय म्हणाला?
बॉलिवूडने आजवर मैत्रीवर आधारित सुपरहिट चित्रपट दिले आहेत आणि या यादीत b या चित्रपटाचं नाव घ्यावचं लागेल… राजकुमार हिरानी दिग्दर्शित हा चित्रपट २००९ मध्ये रिलीज झाला होता… आमिर खान, आर. माधवन, शरमन जोशी आणि करिना कपूर यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचा १६ वर्षांनी सिक्वेल येणार असं म्हटलं जात आहे.. यावर आता आर. माधवन याने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे… काय म्हणाला आहे ३ इडियट्सच्या सीक्वेलबद्दल माधवन जाणून घेऊयात…
बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत आर माधवन म्हणाला की, “‘३ इडियट्स’चा सीक्वल बनणं हे ऐकायला छान वाटतं. पण आमिर खान, शरमन आणि मी आम्ही तिघंही आता म्हातारे झालो आहोत. सीक्वल आला तरी आम्ही त्यात काय भूमिका करणार? आमचं आयुष्य कशाप्रकारे दाखवलं जाईल? ही एक चांगली कल्पना असू शकते. मात्र एका चांगल्या सीक्वलसाठी हे किती योग्य आहे हेदेखील पाहावं लागेल. मला राजकुमार हिराणींसोबत पुन्हा काम करायला आवडेल. मात्र ‘३ इडियट्स’ पुन्हा करणं हा मुर्खपणा ठरेल”.

प्रेक्षकांचा उस्फुर्त प्रतिसाद ३ इडियट्सने मिळवलाच, शिवाय बॉक्स ऑफिसही दणाणून सोडलं होतं. जगभरात ४०० कोटींची कमाई करणारा ‘३ इडियट्स’ पहिला भारतीय चित्रपट ठरला होता. आमिर खान, आर माधवन आणि शरमन जोशी यांच्यासह ‘३ इडियट्स’मध्ये बोमन इराणी, करिना कपूर, मोना सिंह आणि ओमी वैद्य यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. आता खरंच ३ इडियट्स २ येणार का याकडे सगळ्यांचं विशेष लक्ष लागलं आहे…
================================
हे देखील वाचा : राजू, रँचो अन् फरहान हे त्रिकूट पुन्हा एकत्र येणार?; 3 Idiots 2 बाबत मोठी अपडेट समोर
================================
दरम्यान, या चित्रपटातील कलाकारांच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर, नुकताच आर माधवन याचा ‘धुरंधर’ चित्रपट रिलीज झाला… तर, ‘सितारे जमीन पर’ चित्रपटात आमिर खान झळकला होता आणि लवकरच तो ‘लाहौर १९४७’ मध्ये दिसणार आहे… तर, करिना कपूर मेघना गुलजार यांच्या ‘दायरा’ चित्रपटात दिसणार आहे. शिवाय, ‘तख्त’, ‘वीरे दी वेडींग २’ असे तिचे आगामी चित्रपट रिलीज होणार आहेत.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi