Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Rubaab Marathi Movie: मराठमोळा दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे घेऊन येतोय गावाकडची ‘रुबाब’दार लव्ह स्टोरी !

 Rubaab Marathi Movie: मराठमोळा दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे घेऊन येतोय गावाकडची ‘रुबाब’दार लव्ह स्टोरी !
Rubaab Marathi Movie
मिक्स मसाला

Rubaab Marathi Movie: मराठमोळा दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे घेऊन येतोय गावाकडची ‘रुबाब’दार लव्ह स्टोरी !

by Team KalakrutiMedia 03/01/2026

मराठी चित्रपटसृष्टी सतत बदलत असून नव्या विचारांची, वेगळ्या आशयाची आणि दमदार दृष्टीकोन असलेल्या दिग्दर्शकांची नवी पिढी पुढे येत आहे. या नव्या दमाच्या दिग्दर्शकांच्या यादीत आता शेखर बापू रणखांबे (Shekhar Bapu Rankhambe) यांचं नाव ठळकपणे समोर येत आहे. झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित ‘रुबाब’ (Rubaab) या त्यांच्या पहिल्याच मराठी चित्रपटाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या टीझरला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सोशल मीडियावर ‘रुबाब’ची जोरदार चर्चा सुरू आहे. प्रेमकथेचा पाया असलेला हा चित्रपट केवळ रोमँटिक चौकटीत अडकलेला नसून, त्यामागे असलेला स्वाभिमान, आत्मविश्वास आणि ठाम भूमिका यांचं प्रभावी चित्रण करतो.(Rubaab Marathi Movie)

Rubaab Marathi Movie
Rubaab Marathi Movie

शेखर बापू रणखांबे यांचा प्रवास संघर्षातून घडलेला आहे. मुंबईत करिअरच्या शोधात असताना त्यांनी अनेक छोट्या-मोठ्या कामांतून आपली वाट शोधली. सुरुवातीला त्यांनी प्लंबिंगसारखी कामं केली, त्यानंतर रंगभूमीशी त्यांचा संबंध आला. नाटकांच्या पडद्यामागे काम करताना त्यांनी अभिनय, लेखन आणि दिग्दर्शनातील बारकावे जवळून आत्मसात केले.या अनुभवाच्या जोरावर त्यांनी पुढे चित्रपट क्षेत्रात पाऊल ठेवलं. अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत अनुभव साठवला. त्याचबरोबर त्यांनी ‘रेखा’ आणि ‘पॅम्पलेट’ या शॉर्ट फिल्म्सचं लेखन-दिग्दर्शन केलं. ‘पॅम्पलेट’ या लघुपटाची निवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील इंडियन पॅनोरमा विभागात झाली होती, तसेच केरळ इंटरनॅशनल डॉक्युमेंट्री अँड शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये या फिल्मला पुरस्कार मिळाला. ‘रेखा’ या शॉर्ट फिल्मला राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं असून, प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांनी तिची निर्मिती केली होती.

===============================

हे देखील वाचा: ‘माझा मुलगा 4 वर्षांपासून..’ , खंडणी प्रकरणात सुनेच नाव आल्यानंतर अभिनेत्री Archana Patkar ने सोशल मीडियावर केला मोठा खुलासा !

===============================

चित्रपट करण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या शेखर रणखांबे यांचं हे स्वप्न आता ‘रुबाब’च्या माध्यमातून प्रत्यक्षात साकार होत आहे. गावाकडच्या पार्श्वभूमीवर उलगडणारी ही प्रेमकहाणी असली, तरी तिची मांडणी वेगळी आणि विचारप्रवर्तक आहे. प्रेमासोबतच स्वतःचा आत्मसन्मान जपणं, ठामपणे उभं राहणं आणि आयुष्याकडे पाहण्याचा आत्मविश्वासपूर्ण दृष्टिकोन हा या चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे.

Rubaab Marathi Movie
Rubaab Marathi Movie

चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे सांगतात की, ‘रुबाब’ हा चित्रपट माझ्यासाठी खास आहे, कारण हा माझा पहिला सिनेमा आहे. झी स्टुडिओज आणि निर्माते संजय झणकर यांनी दिलेल्या विश्वासामुळे मला योग्य संधी आणि व्यासपीठ मिळालं. कलाकारांनीही प्रामाणिक मेहनत घेतली असून त्यांनी कथेला योग्य न्याय दिला आहे. हा चित्रपट केवळ प्रेमकथा नाही, तर त्यात एक वेगळी ऊर्जा आणि विचार आहे. टीझरला मिळालेला प्रतिसाद पाहून आनंद होतो आणि प्रेक्षकांना हा चित्रपट नक्की आवडेल, असा मला विश्वास आहे.’(Rubaab Marathi Movie)

========================================

हे देखील वाचा: Mi Savitribai Jotirao Phule मालिकेच्या सेटचा भव्य अनावरण सोहळा कलाकारांच्या उपस्थितीत संपन्न!

=========================================

या चित्रपटात संभाजी ससाणे आणि शीतल पाटील हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ‘रुबाब’चं लेखन आणि दिग्दर्शन शेखर बापू रणखांबे यांनी केलं असून संजय झणकर आणि गौरी झणकर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्त्यांची जबाबदारी सांभाळत आहेत.प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरलेला ‘रुबाब’ हा चित्रपट ६ फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वेगळा आशय, नवा दिग्दर्शक आणि ठसठशीत मांडणी यामुळे ‘रुबाब’कडून अपेक्षा नक्कीच वाढल्या आहेत.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Director Shekhar bapu Rankhambe Director Shekhar Rankhambe marathi movie 2026 Rubaab marathi movie Rubaab marathi movie teaser
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.