Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Jai Jai Swami Samarth: गर्भवती कावेरीच्या संकटावेळी दिसणार स्वामींची अद्भुत

Virosh Wedding: Rashmika-Vijay च्या रिसेप्शनला प्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाची हजेरी; समोर

सचिन तेंडूलकरची सून Saaniya Chandhok आहे Business Women!

Rashmika Mandanna & Vijay Devarkonda यांनी वेडिंग रिसेप्शनला ‘त्या’ कृतीने

Sanai Choughade Zee Marathi Serial: ‘सनई चौघडे’ मालिकेत अभिनेता राज

Varsha Usgaonkar यांची 47 लाखांची फसवणूक! दिग्दर्शक-बिल्डरविरोधात गुन्हा दाखल…

‘I am Looser’ म्हणत Rakhi Sawantने पूलमध्ये मारली उडी; राराच्या

अभिनेत्री Aruna Irani अमिताभ बच्चनची नायिका कशी बनली?

Bigg Boss Marathi 6 मध्ये कॅप्टन्सी टास्कदरम्यान मोठा थरार; संकेतच्या

Vicky Kaushal त्या चिमुकलीपुढे झाला नतमस्तक!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

 झी मराठीच्या लोकप्रिय अभिनेत्रीचे दमदार पुनरागमन; ‘Shubh Shravani’ मालिकेत साकारणार मुख्य भूमिका  

  झी मराठीच्या लोकप्रिय अभिनेत्रीचे दमदार पुनरागमन; ‘Shubh Shravani’ मालिकेत साकारणार मुख्य भूमिका  
Shubh Shravani Serial Vallari Viraj
टीव्ही वाले मिक्स मसाला

 झी मराठीच्या लोकप्रिय अभिनेत्रीचे दमदार पुनरागमन; ‘Shubh Shravani’ मालिकेत साकारणार मुख्य भूमिका  

by Team KalakrutiMedia 09/01/2026

Zee Marathi वरील प्राइम टाइम मालिकांच्या वेळापत्रकात लवकरच बदल होण्याची शक्यता आहे. यामागचं कारण म्हणजे वाहिनीवर सुरू होणारी नवी मालिका ‘शुभ श्रावणी’ (Shubh Shravani). नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमधून या मालिकेच्या प्रसारणाची तारीख आणि वेळ स्पष्ट करण्यात आली असून, त्यामुळे सध्या सुरू असलेल्या काही मालिकांच्या वेळेत फेरबदल होणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे.(Shubh Shravani Serial)

Shubh Shravani Serial
Shubh Shravani Serial

‘शुभ श्रावणी’ या मालिकेतून अभिनेत्री वल्लरी विराज (Vallari Viraj) छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. याआधी तिने झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘नवरी मिळे हिटलरला’ ( Navari Mile Hitlarla) मधून प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या नव्या मालिकेत तिच्यासोबत अभिनेता सुमित विजय ( Sumit Vijay) मुख्य भूमिकेत दिसणार असून, झी मराठीवर हा त्याचा पहिलाच मोठा प्रोजेक्ट ठरणार आहे. याशिवाय, ज्येष्ठ कलाकार लोकेश गुप्ते (Lokesh Gupte) आणि आसावरी जोशी ( Asawari Joshi) यांचीही महत्त्वाची उपस्थिती या मालिकेत पाहायला मिळणार आहे.

Shubh Shravani Serial
Shubh Shravani Serial

कथेच्या केंद्रस्थानी असलेली ‘श्रावणी’ ही व्यक्तिरेखा अत्यंत वेगळ्या पार्श्वभूमीतून उभी राहते. वल्लरीने या भूमिकेबद्दल बोलताना सांगितलं की, श्रावणी ही शिक्षणमंत्र्याची मुलगी आहे. घरात संपत्ती, ऐश्वर्य आणि सर्व सोयी उपलब्ध असल्या तरी तिच्या आयुष्यात प्रेमळ वातावरणाचा अभाव आहे. आई नसलेली श्रावणी वडिलांशी भावनिकदृष्ट्या दूर आहे. वडील तिच्याशी का बोलत नाहीत, का तिच्याकडे कायम दुर्लक्ष करतात, याचं नेमकं कारण तिलाही माहित नाही, आणि हाच या कथेचा गाभा आहे. पुढे बोलताना वल्लरीने मालिकेशी जोडली जाण्याचा अनुभवही शेअर केला. ‘नवरी मिळे हिटलरला’ संपल्यानंतर झी मराठीने पुन्हा एकदा एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती, असं ती सांगते. काही महिन्यांनंतर ‘शुभ श्रावणी’साठी थेट ऑफर आल्यावर तिने कोणताही विचार न करता ही भूमिका स्वीकारली. श्रावणीच्या व्यक्तिरेखेची खोली आणि कथा ऐकताच तिला या प्रोजेक्टसाठी होकार द्यावासा वाटला, असंही तिने स्पष्ट केलं. (Shubh Shravani Serial)

==============================

हे देखील वाचा: Bigg Boss Marathi 6 च्या घरात  गौतमी पाटील ची एंट्री? नव्या प्रोमोने चर्चांना उधाण!

==============================

नव्या कथानकासह, दमदार कलाकारांची फौज आणि भावनिक गुंतागुंत घेऊन येणारी ‘शुभ श्रावणी’ झी मराठीच्या मालिकाविश्वात नवा रंग भरणार, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर किती छाप सोडते, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Celebrity Entertainment Marathi TV serial news Shubh Shravani serial Shubh Shravani Zee Marathi Vallari Viraj Vallari Viraj comeback Vallari Viraj lead role Zee Marathi latest show Zee Marathi new serial
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.