
Shiv Thakare लग्न बंधनात अडकला? फोटोमधली ‘ती’ आहे तरी कोण?
२०२५ या वर्षात मराठीसह बॉलिवूड, हॉलिवूड आणि टॉलिवूडच्याही बऱ्याच कलाकारांनी लग्न करत नव्या प्रवासाची सुरुवात केली. आणि आता २०२६ हे नवं वर्ष सुरु होताच अभिनेता-मॉडेल शिव ठाकरे (Shiv Thakare) याने सोशल मिडियावर त्याच्या चाहत्यांना एक सुखद धक्काच दिला आहे. स्वत:च्या लग्नाचा फोटो शेअर करत त्याने लोकांना बुचकळ्यात पाडलं आहे. आता नेमकी ती सुंदरी कोण आहे? आणि खरंच शिवचं लग्न झालं आहे का? अशा चर्चा जोर धरु लागल्या आहेत.

तर, मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या सीझनचा विजेता शिव ठाकरे याने त्यांच्या इन्स्टाग्रामवर ल्गाचा फोटो शेअर करत फायनली असं कॅप्शन दिलं आहे. त्याच्या या पोस्टवर मराठी-हिंदी फिल्मी इंडस्ट्रीतील कलाकारांनी शिवला शुभेच्छा दिल्या आहेत. शिवने मुंडावळ्या बांधल्या असून त्याची बायको त्याच्या खांद्यावर डोकं ठेऊन लाजताना दिसत आहे. शिवने बायकोचा चेहरा न दाखवल्यामुळे गॉसिप्सने अजूनही जोर धरला आहे. आता ती मुलगी कोण आहे? याचं उत्तरही शिवर लवकर देईल अशी अपेक्षा आहे. (Marathi Big Boss Season 2)
================================
हे देखील वाचा : Bigg Boss Marathi 6: ८०० खिडक्या ९०० दारं; बिग बॉस मराठीच आलिशान घर पाहिलं का?
================================
दरम्यान, दुसरीकडे हा फोटो पाहून असं देखील म्हटलं जातंय की त्याने खरोखरं लग्न केलं नसून तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला नवा प्रोजेक्ट आणणार आहे. आता या फोटो मागचं सत्य शिव लवकरच स्पष्ट करेल, अशी सर्वांना आशा आहे. शिवच्या आधीच्या रिलेशनबद्दल बोलायचं झालं तर, बिग बॉसच्याच घरातील कंटेस्टंट अभिनेत्री वीणा जगताप (Veena Jagtap) आणि शिव ठाकरे रिलेशनशिपमध्ये होते. परतुं, काही कारणामुळे दोघांचं ब्रेकअप झालं. आता वीणा नंतर त्याच्या आयुष्यात आलेली ती कोण आहे? आणि खरचं लग्न झालंय का याचा उलगडा लवकरच शिव उलगडा करेल, अशी शक्यता आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi