
अमेरिकेतही Dhurandhar चा दबदबा, रणवीर सिंगच्या चित्रपटाने कमावले ‘इतके’ कोटी
२०२५ हे वर्ष खऱ्या अर्थाने रणवीर सिंगसाठी (Ranveer Singh) लकी ठरलं आहे. आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ (Dhurandhar Movie) चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलं असून बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणारा धुरंधर हा पहिला चित्रपट ठरला आहे. ८१० कोटींचा टप्पा बॉक्स ऑफिसवर पार करत या चित्रपटाने ८०० कोटी क्लब बॉलिवूडमध्ये सुरु केला आहे. बरं, या चित्रपटाने केवळ भारतातच नाही तर जगभरातही डंका वाजवला आहे. जाणून घेऊयात धुरंधरच्या अमेरिकेतील कमाईबद्दल…(Bollywood News)
मिळालेल्या माहितीनुसार ‘धुरंधर’ने नॉर्थ अमेरिकेत $20 मिलियनहून अधिक म्हणजेच २ कोटींपेक्षा अधिक ग्रॉस कलेक्शन केलं आहे. विशेष म्हणजे अमेरिकेतील या ऐतिहासिक कमाईमुळे रणवीर सिंग आता प्रभास आणि इतर भारतीय कलाकारांच्या यादीत सामील झाला आहे. (Dhurandhar International Collection)

तसेच, आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘बाहुबली २’ (Bahubali 2) नंतर सर्वाधिक कमाई करणारा ‘धुरंधर’ दुसरा भारतीय चित्रपट असून तब्बल ९ वर्षांनी हा रेकॉर्ड तयार झाला आहे. नॉर्थ अमेरिकेत ‘धुरंधर’ पाहण्यासाठी २० लाखांहून अधिक प्रेक्षकांनी हजेरी लावली होती आणि सलग सगळे शो हाऊसफुल होते.
सॅकनिल्कच्या माहितीनुसार, या चित्रपटाने पहिल्या आठवड्याच्या शेवटी २०७.२५ कोटी, दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी २५३.२५ कोटी, तिसऱ्या आठवड्याच्या शेवटी १७२ कोटी, चौथ्या आठवड्याच्या शेवटी १०६.५ कोटी, पाचव्या आठवड्याच्या शेवटी ५१.२५ कोटी कमवत आत्तापर्यंत या चित्रपटाने ८३० कोटींचा टप्पा पार केला आहे. (Dhurandhar Box Office Collection)
================================
हे देखील वाचा : दीपाली सय्यद ते सागर कारंडे; Bigg Boss Marathi 6 च्या पर्वातील सदस्यांची यादी!
================================
दरम्यान, ‘धुरंधर’ चित्रपटाच्या कास्टबद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटाक रणवीर सिंग प्रमुख भूमिकेत असून त्याच्यासोबत संजय दत्त, आर. माधवन आणि अक्षय खन्ना (Akshaye Khanna) यांसारखी तगडी स्टारकास्ट आहे. १९ मार्च २०२६ रोजी ‘धुरंधर २’ चित्रपट भेटीला येणार असून याच दिवशी यश याचा टॉक्सिक चित्रपट देखील रिलीज होणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर आता कोणता चित्रपट सरस ठरणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. (Entertainment News)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi