
“काही निर्माते जास्त शेफारलेत…”; खोपकरांचा Digpal Lanjekar यांना धमकी वजा इशारा!
बऱ्याचदा असं होतं की मराठी चित्रपटांसमोर मोठे हिंदी किंवा साऊथचे चित्रपट एकाच दिवशी रिलीज होतात आणि त्याचा परिणाम हा मराठी चित्रपटांच्या शो वर होतो. पण अलीकडे एकाच दिवशी २-३ मराठी चित्रपटच रिलीज होत असल्यामुळे मराठी चित्रपटांमध्येच चढाओढ दिसून येते. म्हणजेच काय तर मराठीचा सामना इतर भाषिक चित्रपटांसोबत सुरु असताना आता मराठीला आपलयाच माणसांनाही सामरं जात स्वत:चं अस्तित्व टिकवण्यासाठी झगडावं लागतं. असंच काहीसं घडलं आहे ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ आणि ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या चित्रपटाबद्दल. एकाच दिवशी हे दोन्ही चित्रपट रिलीज होत असल्यामुळे ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ चे निर्माते अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी मराठीत काही निर्माते शेफारले आहेत असं म्हणत लांजेकरांना थेट इशारा दिला. (Marathi Movie 2026)
तर, झालं असं आहे की, अंकुश चौधरी (Ankush Chaudhari) दिग्दर्शित आणि ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ चित्रपट ३० जानेवी २०२६ रोजी रिलीज होणार होता. आणि दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ हा चित्रपट १६ फेब्रुवारी २०२६ रोजी रिलीज होणार होता. मात्र, आता या चित्रपटाने प्रदर्शनाची तारीख बदलून ३० जानेवारी केली आहे. यावरुन निर्माते अमेय खोपकर संतापले असून दिग्पाल लांजेकरांना त्यांनी खडेबोल सुनावले आहेत. (Digpal Lanjekar Movies)
‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ चित्रपटाच्या कार्यक्रमावेळी खोपकर म्हणाले की,”मला आज एक गोष्ट सांगायची आहे, ज्याचा मी निषेध करतो. कारण इतर निर्माते गप्प बसतात, मी गप्प बसणार नाही, मी बोलणार. ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ची तारीख मी इतर चित्रपटांसाठी तीन वेळा बदलली. दुसऱ्या आपल्याच मराठी चित्रपटांना तारीख मिळू दे, त्याला थिएटर्स मिळतील, तो सिनेमा चालेल, त्याला दोन-चार आठवडे मिळू दे, आपण नंतर घेऊ अशी भावना होती. आता तीन-चार दिवसापूर्वी दिग्पाल लांजेकरने त्याचा ऐतिहासिक सिनेमा जो आधी १६ फेब्रुवारीला येणार असल्याचं जाहीर केलं होतं, त्याचं तसं पोस्टरही लाँच झालं होतं, त्याचं काम पूर्ण झालं होतं आणि अचानक ३० जानेवारीची घोषणा केली. कोणाला विचारलं नाही, सांगितलं नाही, थेट घोषणा केली”.

पुढे ते म्हणाले, “मी दुसऱ्या दिवशी दिग्पाल लांजेकरला फोन लावला. मी म्हटलं ‘अहो माझ्या चित्रपटाची तारीख आधीच जाहीर केली आहे, हे तुम्ही करू नका, हे चुकीचं आहे.’ तर त्याने म्हटलं ‘ओह तुमची आहे का फिल्म’. मला हेच कळलं नाही की, ‘तुमची आहे का फिल्म’ म्हणजे काय? बाहेरचा एखादा निर्माता असता तर. त्यानंतर त्यांनी सांगितलं की, हे डिस्ट्रिब्युटरचं म्हणणं आहे. मी त्यांना म्हटलं की, डिस्ट्रिब्युटरचा काहीही संबंध नसतो. चित्रपटाची तारीख हा निर्मात्याचा निर्णय असतो. मी म्हटलं की, ‘तुम्ही तारीख बदला, तुमचा मोठा सिनेमा आहे, तुमचा सिनेमादेखील चालला पाहिजे. तुमच्या सिनेमालाही थिएटर्स मिळू देत.मी आधी तारीख जाहीर केली आहे, तुम्ही आता असं करू नका. मी एवढं बोललो आणि तारीख बदलून मला कळवा असं सांगितलं,” अशी माहिती त्यांनी दिली.
अमेय संतापून पुढे म्हणाले की, “दुसऱ्या दिवशी फोन केला तर उचलला नाही. तेव्हापासून आजतायगत मला फोन आलेला नाही. मी विषय सोडून दिला, पण मी या गोष्टीचा निषेध करतो. मी फक्त ऐतिहासिक आणि महाराजांवर चित्रपट आहे म्हणून गप्प आहे. आपण मराठी निर्माते दिवसाला तीन-चार चित्रपट येतात आणि गप्प बसतो, काही बोलत नाही, म्हणून काही निर्माते खरंच शेफारले आहेत. काही निर्मात्यांची मस्ती उतरवायला हवी, त्यांना बॅन करण्याची गरज आहे.‘

शेवटी लांजेकरांना धमकीवजा इशारा देत खोपकर म्हणाले की, “दिग्पाल लांजेकरने असाच आगाऊपणा केला, तर मी निर्माता संघ आणि महामंडळाला सांगेन की, दिग्पाल लांजेकरवर बंदी टाका. आमच्या चित्रपटासाठी 150-200 लोकांनी मेहनत घेतली, त्यांची मेहनत काय फुकट जाऊ द्यावी? मी फक्त या गोष्टीचा निषेध करतो, त्यांनादेखील थिएटर मिळू दे, आम्हालादेखील थिएटर मिळू दे”…
================================
================================
दरम्यान, ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर, २००६ मध्ये आलेल्या साडे माडे तीन चित्रपटाचा सीक्वेल आहे. याच अशोक सराफ, मकरंद अनासपुरे आणि भरत जाधव यांच्या प्रमुख भूमिकेत आहे. तर, यावेळी रिंकू राजगुरु हिची देखील यांच्या टीममध्ये एन्ट्री झाली आहे. आता ३० जानेवारीला ‘मर्दानी ३’ (Mardaani 3) आणि ‘मयसभा’ (Mayasabha) हे दोन बॉलिवूडचे चित्रपट देखील रिलीज होत असल्यामुळे आता बॉक्स ऑफिसवर कोणत्य़ा चित्रपटाला प्रेक्षक पसंती देतात हे पाहणं फार महत्वाचं आहे. तसेच, अमेय खोपकर यांच्या इशाऱ्याला आता लांजेकर या प्रत्युत्तर देतात याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi