
Hemant Dome यांच्या ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ चित्रपटाने गाठला परदेश!
२०२६ या वर्षाची सुरुवात मराठी चित्रपटाने दमदार केली. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ (Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam) या चित्रपटाने केवळ महाराष्ट्रातच नाही तर अख्खया देशात आपला ठसा उमटवला आहे. १ जानेवारी २०२६ रोजी रिलीज झालेला हा चित्रपट रणवीर सिंगच्या धुरंधर चित्रपटाला तगडी टक्कर दिली आहे. आता क्रांतिज्योतीच्या या हुश्शार पोरांनी मोठी झेप घेतल्याचे पाहायला मिळाले. कारण परदेशात काही महत्वाच्या ठिकाणी हेमंत ढोमे आणि क्षिती जोग यांचा हा चित्रपट रिलीज होणार आहे.
चलचित्र मंडळी’च्या इन्स्टाग्राम पेजवरुन पोस्ट शेअर करण्यात आली की, ”क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ आता भारतासह दुबई, अबूधाबी, ओमान, शारजाह, बाहरैन येथे खास प्रदर्शित.’ ही आनंदाची बातमी शेअर करताना टीमने अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर आणि क्षिती जोग यांचा व्हिडिओ शेअर केला आहे. (Marathi Movie 2026)

व्हिडिओमध्ये क्षितीने म्हटलंय की, ‘नमस्कार आम्ही आहोत क्रांतिज्योती विद्यालयचे विद्यार्थी आणि आम्ही आमचा सिनेमा ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ घेऊन येणार आहोत, तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये…’ तर अमेयने म्हटले की, ‘भारतात गाजणारा आमचा हा सिनेमा आम्ही घेऊन येतोय खास तुमच्यासाठी दुबई, अबूधाबी, ओमान, शारजाह, बाहरैन... सगळीकडे खास तुमच्यासाठी.’ सिद्धार्थने याकरता कोणाशी संपर्क साधायचा याविषयीही माहिती सांगितली. (Hemant Dhome Movies)
================================
================================
दरम्यान, चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायच झालं तर, सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चित्रपटाने पहिल्या दिवसाची ओपनिंग ७ लाखांनी केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ४५ लाख, तिसऱ्या दिवशी १.०५ कोटी, चौथ्या दिवशी १.५ कोटी, पाचव्या दिवशी ५ लाख, सहाव्या दिवशी ५ लाख, सातव्या दिवशी ५ लाख, आठव्या दिवशी ५५ लाख कमवत पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने ५.७५ कोटी कमावले होते. पुढे नवव्या दिवशी ६ लाख, दहाव्या दिवशी १.६५ कोटी, अकराव्या दिवशी २.१ कोटी, बाराव्या दिवशी ६५ लाख, तेराव्या दिवशी ६६ लाख, चौदाव्या दिवशी ८ लाख कमवत आत्तापर्यंत एकूण ११.४९ कोटी कमावले आहेत. (Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi