
Sairat सिनेमातील परशा उतरणार राजकारणाच्या मैदानात? वायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण
राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकांची जोरदार धामधूम सुरू आहे. तब्बल नऊ वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुकांचा प्रचार काल संध्याकाळी संपला असून, गेल्या दहा दिवसांत सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारासाठी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली. जाहीरनाम्यांच्या माध्यमातून मतदारांना विविध आश्वासने देण्यात आली, तर मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी स्टार प्रचारकांचीही फौज मैदानात उतरली. काही ठिकाणी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनीही प्रचारात सहभाग घेतला.(Actor Akash Thosar)

दरम्यान याच पार्श्वभूमीवर लातूर शहरात काँग्रेस पक्षाच्या प्रचार रॅलीत अभिनेता आकाश ठोसर सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. ‘सैराट’ चित्रपटातून घराघरात पोहोचलेला आकाश ठोसर (Akash Thosar) ग्रामीण भागातील प्रचारासाठी उतरल्याने रॅलीला विशेष आकर्षण मिळालं. सनरूफ असलेल्या चारचाकीतून त्याने मतदारांशी संवाद साधत काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारात सहभाग घेतला. या रॅलीचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

प्रभाग क्रमांक एकमधील काँग्रेसचे उमेदवार अॅड. गोपाळ बुरबुरे (Adv. Gopal Burbure) यांच्या प्रचारासाठी ही रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीत काँग्रेसचे कार्यकर्ते, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मात्र, आकाश ठोसरच्या उपस्थितीमुळे रॅलीकडे नागरिकांचे विशेष लक्ष वेधले गेले. अभिनेता पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. सैराटमुळे प्रचंड लोकप्रियता मिळवलेल्या आकाश ठोसरचा प्रचारातील सहभाग अनेकांसाठी आश्चर्याचा विषय ठरला असून, त्यामुळे मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. (Actor Akash Thosar)
==========================
==========================
दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे लातूरचे राजकीय वातावरण तापले होते. त्यांच्या या विधानाचा काँग्रेसकडून तीव्र निषेध करण्यात आला. ‘लातूर शहरातून विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील’ या वक्तव्यावर अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) यांनी शांत पण ठाम शब्दांत प्रतिक्रिया दिली. त्यांच्या या प्रतिक्रियेला काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मोठे समर्थन मिळाले असून, संबंधित व्हिडिओही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.