
Bigg Boss Marathi 6 च्या घरात चोरी? स्पर्धकांमध्ये संशयाचे वातावरण, नेमका चोर कोण?
Bigg Boss Marathi 6 या नव्या पर्वाची सुरुवात होऊन अवघे चारच दिवस झाले असतानाच, घरामध्ये प्रचंड गदारोळ निर्माण झाला आहे. सुरुवातीपासूनच चर्चेत असलेला हा सीझन आता एका धक्कादायक घटनेमुळे अधिकच रंगतदार झाला आहे. बिग बॉसच्या घरात एक मोठी चोरी झाल्याचा प्रकार समोर आला असून, त्यामुळे घरातील सर्व स्पर्धक पूर्णपणे हादरून गेले आहेत. या चोरीमागे नेमका कोण आहे, यावरून घरात संशय, तणाव आणि आरोप-प्रत्यारोपांचे वातावरण तयार झाले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये घरातील सदस्य एकमेकांवर थेट आरोप करताना दिसत आहेत. काही स्पर्धक या घटनेकडे केवळ चोरी म्हणून न पाहता, त्या व्यक्तीची वृत्ती आणि मानसिकता असल्याचे बोलताना दिसतात, तर काही जण त्या व्यक्तीला सर्वांसमोर उघड करण्याची ठाम मागणी करत आहेत. (Bigg Boss Marathi 6)

“घरातल्या सगळ्यांना कळलं पाहिजे की तो माणूस नेमका कोण आहे,” अशा संतप्त प्रतिक्रिया प्रोमोमध्ये ऐकायला मिळत आहेत. या प्रकारामुळे आतापर्यंत जुळलेली घरातील समीकरणे बदलणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मैत्री, विश्वास आणि संघटन यावर या चोरीचा नेमका काय परिणाम होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.दरम्यान, या प्रकरणावर बिग बॉस काय भूमिका घेणार आणि दोषी व्यक्तीवर कोणती शिक्षा होणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. हा ‘चोरीचा मामला’ नेमका काय आहे आणि त्यामागचे सत्य काय, हे उघड होण्यासाठी प्रेक्षक पुढील भागांची आतुरतेने वाट पाहत आहेत.

‘बिग बॉस मराठी ६’ च्या या नव्या सीझनमध्ये अनेक ओळखीची आणि चर्चित चेहरे सहभागी झाले आहेत. यामध्ये प्रभु शेळके उर्फ डॉन ( Prabhu Shekale), अनुश्री माने, राकेश बापट, रोहन भजनकर, दिव्या शिंदे, नृत्यांगना राधा पाटील, ओमकार राऊत, विशाल कोटियन, दीपाली सय्यद ( Deepali Sayyed) , सागर कारंडे, तन्वी कोलते, सचिन कुमावत, सोनाली राऊत, आयुष संजीव, रुचिता जामदार आणि करण सोनावणे या स्पर्धकांचा समावेश आहे. (Bigg Boss Marathi 6)
===============================
===============================
अवघ्या काही दिवसांतच इतका मोठा वाद निर्माण झाल्यामुळे, यंदाचा सीझन प्रचंड गाजणार, यात शंका नाही. आता या चोरीच्या प्रकरणातून कोणाचा खरा चेहरा समोर येणार आणि कोणाचं खेळातलं गणित बिघडणार, हे पाहणं नक्कीच रंजक ठरेल.