
‘हम ये वादा तुटने नही देंगे!’; Border 2चा ट्रेलर रिलीज!
सनी देओल, अहान शेट्टी आणि वरुण धवन यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘बॉर्डर २’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. भारतीय सैन्यदिनाच्या मुहूर्तावर आज १५ जानेवारी २०२६ रोजी ‘बॉर्डर २’चा बहुप्रतिक्षित ट्रेलर प्रेक्षकांच्या समोर आणला. भारतीय सशस्त्र दलांच्या शौर्याला मानवंदना देणारा ‘बॉर्डर २’चा ट्रेलर पाहून प्रेक्षकांमध्ये अधिक उत्सुकता वाढली आहे. (Border 2 Movie)
‘बॉर्डर २’ चित्रपटाचं कथानक १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील सत्य घटनांवर आधारित आहे. भारताचे लष्कर (Army), नौदल (Navy) आणि वायुसेना (Air Force) जेव्हा एकत्र येतात, तेव्हा नेमकं काय घडते याचा थरार प्रेक्षकांसमोर या चित्रपटातून मांडण्यात येणार आहे. ट्रेलरची सुरुवात अंगावर शहारे आणणाऱ्या दृश्यांनी होते. सीमेवर लढणारे जवान, समुद्रावर वर्चस्व गाजवणारे नौदल आणि आकाशात झेपावणारी फायटर जेट्स यामुळे हा चित्रपट एक भव्य ॲक्शन सोहळा ठरणार आहे.

विशेष म्हणजे या ही चित्रपटात सनी देओल असून त्यांचे खणखणीत संवाद आणि जबरदस्त अभिनय पाहून ‘बॉर्डर’ची आठवण येतेच. त्यांच्यासोबत वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी हे कलाकार भारतीय सैनिकांच्या आव्हानात्मक भूमिकेत दिसत आहेत. (Sunny Deol)
================================
हे देखील वाचा : Bigg Boss Marathi 6 मध्ये तन्वी कोलते ढसाढसा रडली; घरात नेमकं झालं तरी काय ?
================================
दरम्यान,‘बॉर्डर २’ची निर्मिती आणि प्रदर्शन गुलशन कुमार आणि टी-सीरीज प्रस्तुत, जे.पी. दत्ता यांच्या जे.पी. फिल्म्सच्या सहकार्याने या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. अनुराग सिंग यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून देशभक्ती आणि साहसाची ही महागाथा २३ जानेवारी २०२६ रोजी देशभरात रिलीज होणार आहे. (Bollywood Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi