
Bigg Boss Marathi 6 : तन्वी कोलतेने सागर कारंडेला ‘कॉमेडी’वरून हिणवलं; कारंडेचाही पारा चढला आणि…
कलर्स मराठी वाहिनीवरील बहुचर्चित शो बिग बॉस मराठी सीझन ६ प्रेक्षकांचं लक्ष वेधत आहे. नुकताच या घरात कॅप्टनसीचा टास्क झाला. या टास्कवेळी स्पर्धकांमध्ये तुफान राडा झालेला पाहायला मिळाला. विशालने तर गळा पकडल्याचा थेट आरोप ओमकारने केला. इतकंच नाही तर, टास्क संपल्यानंतर सोनालीनं कानाखाली मारल्याचं तन्वी म्हणाली. आता यात तन्वी कोलते आणि सागर कारंडे यांच्यामध्ये वाद झाला असून तन्वीने सागरला त्यांच्या प्रोफेशनवरुन खरीखोटी सुनावली. नेमकं काय झालं आणि सागरने तन्वीला काय उत्तर दिलं जाणून घेऊयात..
‘बिग बॉस मराठी ६’मध्ये चौथ्या दिवशी ‘लांडगा आला रे आला’ हा टास्क कॅप्टन्सीसाठी खेळवण्यात आला. लोकर गोळा करून त्या मेंढ्यांमध्ये भरून मेंढ्या बनवायच्या असतात. या खेळात बाद होणाऱ्या स्पर्धकाचे सीक्रेटही समोर येणार होतं. अनुश्री आणि सोनाली यांची टीम ‘ए’ होती तर तन्वी आणि प्राजक्ता आणि टीम ‘बी’ होती. ओमकार आणि सागर, अनुश्री-सोनालीच्या टीमकडून खेळले तर, विशाल आणि आयुष प्राजक्ता-तन्वीच्या टीमकडून खेळले. ओमकार आणि विशालमध्ये हातापायी झाल्यामुळे बिग बॉस यांनी टास्क थांबवला. एकीकडे टास्क थांबला आणि तिथे सोनालीनं माझ्या कानाखाली मारली, असं म्हणत तन्वीने आकांडतांडव केला. यावरुन सगळेच स्पर्धक चिडले होते. त्य़ावेळी सागर म्हणाले की, ‘तोंड आहे की गटार’ यावर तन्वीने सागरला ‘बावळट’ असं म्हटलं.

पुढे, सागर आणि अनुश्री बोलत असताना तन्वी तिथे आली आणि म्हणाली ‘टास्क थांबवलाय’ त्यावर सागर म्हणाला, ‘तू नको सांगू’. यावरुन तन्वीने रागाच्या स्वरात म्हटलं की ‘मी लक्ष ठेवून आहे तुझ्यावर. कॉमेडी करत जातो तू. तुला वाटतं कॉमेडी करतो म्हणून’ तन्वीनं असं बोलताच सागरचा पारा चढला. सागरचा राग अनावर झाली आणि तो म्हणला, ‘कॉमेडी माझं प्रोफेशन आहे’ सारवासारव करत तन्वी म्हणते, ‘प्रोफेशनवर बोलले नाहीये मी. तू कॉमेडी करून भांडण मिटवतो’ सागरही मोठ्याने, ‘कुणाच्या बापाचं खात नाही’ असं म्हणतो. तरीही तन्वी कॅमेरासमोर मोठ-मोठ्याने ओरडते. सर्व स्पर्धकांना तन्वीचं बोलणं खटकतं. करणसुद्धा सागरची बाजू घेऊन ‘तिनं असं प्रोफेशनबद्दल बोलायला नको’ असं म्हणतो.
================================
हे देखील वाचा : Bigg Boss Marathi 6 च्या घरात चोरी? स्पर्धकांमध्ये संशयाचे वातावरण, नेमका चोर कोण?
================================
यानंतर, सागरचा पारा चढताच तो म्हणाला की, ”माझं प्रोफेशन आहे ते. त्यावर जायचं नाय.” एकीकडे सागरला सर्वजण बाहेर समजावत होते. दिपाली सय्यद, सचिन कुमावत यांनी सागरची बाजू घेतली. त्यांनीही तन्वीला दोष दिला. करण सोनावणेही सागरला समजावत होता. त्यावेळी एकाक्षणी सागरचा संयम सुटला आणि तो म्हणाला की, ”अरे आयचा घो तुझ्या… प्रोफेशन काढते म्हणजे काय… असशील तू मोठी घरी”, असं सागर मोठ्याने म्हणाला. सागरचं रौद्र रुप बघून सर्वजण थक्क झाले. सर्वांनी सागरला शांत करण्याचा प्रयत्न केला. तन्वी आतमध्ये जाऊन रडायला लागली. आता शनिवारी भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख या प्रकरणावर काय बोलणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi